महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विविधतेत एकता असणारे हिंदुत्व एकमेवाद्वितीय !

07:00 AM Nov 16, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Advertisement

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisement

भारताला वैभवशाली आणि सामर्थ्यसंपन्न बनविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जो भारताला माता मानतो, असा प्रत्येकजण हिंदू आहे. हिंदुत्व ही एकमात्र विचारधारा अशी आहे की जी विविधतेत एकता मानते. म्हणूनच संघाच्या शाखेवर जो येतो त्याची कधीही जात विचारली जात नाही. भारतवर्षाच्या विविधतेत एकात्मता असून या साऱया विविधतेचा सन्मान संघ करतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते अंबिकापूर येथे मंगळवारी बौद्धिक कार्यक्रमात बोलत होते.

हा कार्यक्रम यथील पीजी महाविद्यालयाच्या मैदानात झाला. संघाचा आपला कोणताही स्वार्थ नाही. पूर्ण भारताचे उत्थान हाच आमचा स्वार्थ आहे. संघाचा प्रारंभ झाला तेव्हा विचारधारेशी लोकांची संलग्नता कमी होती. आज मात्र लोकांना संघाविरोधात भडकाविले जात असूनही जनता संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत आहे, ही मोठी उपलब्धी आहे. भारतावर जेव्हा संकट येते तेव्हा, आपल्यामध्ये कितीही संघर्ष असला तरी आपण एकत्र येतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ईश्वराचा वास सर्वांमध्ये

आपल्या धर्माबरोबर अन्य धर्मांचाही आपण सन्मान करावयास हवा. आपण आपल्या घरात कोणत्याही देवदेवतेची आराधना करत असू. कोणत्याही धर्माचे अनुसरण करीत असू. पण देशसासाठी आपण एकजूट झाले पाहिजे. मातृभूमी आपल्यासाठी सर्वतोपरी आहे. हिंदू धर्म हा एक सांप्रदाय नाही. ती एक जीवनपद्धती आहे. सर्व धर्मांचा हाच उपदेश आहे की सर्वांमध्ये ईश्वर आहे. पेमाने रहा, इतरांची सेवा करा, हेच प्रत्येक धर्माचे तत्व असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.

10 हजार स्वयंसेवकांची उपस्थिती

या कार्यक्रमाला चार जिल्हय़ांमधून पूर्ण गणवेषातील 10 हजारांहून अधिक स्वयंसेवकांची उपस्थिती होती. सरगुजा, सूरजपूर, बलरामपूर आणि जशपूर या चार जिल्हय़ांमधून हे स्वयंसेवक आलेले होते. त्यांनी शानदार पथसंचलन केले. या कार्यक्रमाला छत्तीसगड विधानसभेतील विरोधी पक्षनेते नारायण चंदेल, केंद्रीय मंत्री रेणुका सिंग, आमदार वृजमोहनसिंग आणि अन्य भाजप नेतेही उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article