विल स्मिथने दिला फिल्म अकादमीचा राजीनामा
ऑनलाईन टिम / मुंबई
ख्रिस रॉकला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात थप्पड मारल्यानंतर अभिनेता विल स्मिथने मोशन पिक्चर अकादमीचा राजीनामा दिला. संस्थेने ठोठावलेली कोणतीही शिक्षा त्याला मान्य असेल असेही विल स्मिथने सांगितले.
स्मिथने शुक्रवारी दुपारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या वागणुकीचे कोणतेही परिणाम तो पूर्णपणे स्वीकारत आहे. 94 व्या अकादमी पुरस्कारांच्या सादरीकरणातील माझी कृती धक्कादायक, वेदनादायक आणि अक्षम्य होती."
इल्म अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी सांगितले की, स्मिथचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. "आम्ही 18 एप्रिल रोजी अकादमीच्या बोर्ड बैठकीच्या अगोदर, अकादमीच्या आचार मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल स्मिथ विरुद्ध अनुशासनात्मक कार्यवाही पुढे ठेवणार आहोत". स्मिथने त्यांच्या राजीनाम्यामुळे मतदानाचे विशेषाधिकार गमावले. परंतु हॉलीवूडची सर्वात प्रतिष्ठित संस्था असलेल्या अकादमीचा भाग होण्याचे इतर, अनेक फायदे असुन ते तिच्या सदस्यांना उद्योग विश्वासार्हता प्रदान करते.