For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विराट कोहली, रोहित शर्माकडून फलंदाजीचा भरपूर सराव

06:52 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
विराट कोहली  रोहित शर्माकडून फलंदाजीचा भरपूर सराव
Advertisement

वृत्तसंस्था/ सेंच्युरियन

Advertisement

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अजूनही त्पा पराभवाच्या वेदना क्रिकेट रसिकांना जाणवत आहेत. असे असले, तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन पूर्णणे व्यावसायिक खेळाडू असून तो पराभव विसरून पुढे जाणे महत्त्वाचे असल्याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्याचमुळे दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेच्या आधी सरावात घाम गाळण्यावर त्यांनी शांतपणे लक्ष केंद्रीत केले आहे.

भारतीय संघाला मागील 31 वर्षांत दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका विजय नेंदविता आलेला नाही आणि आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेले विराट आणि रोहित हे दोघेही जे इतर कोणताही भारतीय संघ करू शकलेला नाही ते या दौऱ्यात साध्य करून दाखविण्यास उत्सुक असतील. लंडनमध्ये कुटुंबासोबत अल्पशा विश्रांतीनंतर परत आलेला कोहली अर्ध्या तासानंतर सरावात सामील झाला, तर रोहित तीन आठवडे स्वत:ला क्रिकेटपासून दूर ठेवल्यानंतर थोडासा आरामशीर दिसला.

Advertisement

दोघांनीही वेगवेगळ्या जाळ्यांत आणि सरावाच्या खेळपट्यांवर फलंदाजी केली. त्याशिवाय एका तासापेक्षा जास्त काळ ‘थ्रो डाउनचा’ही सामना केला. मध्ये त्यांनी  थोडी विश्रांती घेतलेली असली, तरी त्यांच्यात क्वचितच संवाद झाला. विश्वचषक स्पर्धेच्या वेळी भारतीय संघ सराव करताना मात्र वेगळे चित्र दिसले होते. यावेळी एकच आवाज लक्ष वेधून घेत होता आणि तो चेंडूवर आपटणाऱ्या बॅटचा होता.

के. एल. राहुलने पटकन पॅड्स बांधल्याने प्रशिक्षक राहुल द्रविडची नजर ‘सेंटर नेट’वर राहिली. कोना भारतने तर पहिल्या तासात यष्टिरक्षकाचे हातमोजे घालण्याचीही तसदी घेतली नाही. त्यामुळे यष्टिरक्षण कोण करेल हे स्पष्ट झालेले आहे. स्लीपमधील क्षेत्ररक्षणाच्या सरावातून ते आणखी अधिक स्पष्टपणे जाणवले. राहुलने यष्टिरक्षणाचा सराव केला त्यावेळी तऊण खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी त्याला साथ दिली.

सुपरस्पोर्ट पार्कमध्ये तीन तास सर्वांनी भरपूर सराव केला. जाळयात सरावासाठी रोहित प्रथम आला आणि त्यानंतर यशस्वी जैस्वाल दाखल झाला. त्यांनी आलटून पालट tन जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर यांच्या प्रत्येकी पाच चेंडूंचा सामना केला. तथापि, रोहितची खासियत असलेला स्वीपचा फटका जेव्हा अश्विन गोलंदाजीस आला तेव्हा पाहायला मिळाला. कर्णधार सराव करत असताना कोहली आंत आला आणि त्याने रोहितची फलंदाजी पाहत असताना प्रशिक्षक द्रविडशी थोड्या गप्पाही मारल्या. काही वेळानंतर कोहली बाहेर पडला आणि ‘थ्रोडाउन’साठी त्याने पॅड्स बांधले. त्यानंतर रोहित आणि जैस्वाल काही मिनिटांत तेथे येऊन मिळाले. भारतीय संघ त्याच्या मुख्य प्रशिक्षकांप्रमाणे सरावात खूप गंभीर दिसून आला.

दरम्यान, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि शक्यतो गेराल्ड कोएत्झी यांचा समावेश असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला सामोरे जाताना भारत आपली फलंदाजीची ताकद कमी करण्याची शक्यता नाही. म्हणूनच आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीचा विचार करता शार्दुल ठाकूरला पुन्हा एकदा संधी मिळून रविचंद्रन अश्विनला बसावे लागू शकते. त्यातच पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.

टीम इंडियाची सेंच्युरियन भ्रमंती

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या सरावाला सुरूवात झाली असून वरिष्ठ खेळाडू संघासोबत जोडले गेले आहेत. अशातच कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह संपूर्ण संघाने वेळात वेळ काढत सेंच्युरियन शहराची भ्रमंती केली. 26 डिसेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीआधी भारतीय संघाकडे एक दिवसाचा मोकळा वेळ होता. अशात संघातील खेळाडूंनी या मोकळ्या वेळात मैदानाबाहेर फिरण्याचा आनंद लुटला. यावेळ संघासोबत सपोर्ट स्टाफचे सदस्य आणि रोहित शर्माची पत्नी रितीका देखील उपस्थित होती.

आमच्या वेगवान गोलंदाजांपासून सावधान,

भारताविरुद्ध ‘बॉक्सिंग डे‘ कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी सरावाला सुरुवात केली आहे. अशात द.आफ्रिकन संघाचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनरड यांनी टीम इंडियाला इशारा देताना रबाडा व एन्गिडी सारखे वेगवान गोलंदाज भारताविरुद्ध आग ओकताना दिसतील, असे त्यांनी म्हटले आहे. रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी शनिवारी नेट सत्रात चांगला सराव केला होता. यादरम्यान त्यांचा सामना अनुभवी फलंदाज डीन एल्गर करत होता. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फायदा मिळतो, असा कल आहे. अर्थात, यासाठी हवामानाची देखील साथ असणे महत्वाचे आहे. यातच शनिवारी सराव सत्र संपल्यानंतर आफ्रिकन प्रशिक्षक कॉनरड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आमचे दोन्ही गोलंदाज  ताजेतवाने आणि आक्रमक स्वरुपात मैदानावर दिसतील. खरं तर, दोन्ही अनुभवी गोलंदाज कोणत्याही सराव सामन्याशिवाय भारताविरुद्ध उतरणार आहेत, पण याची जास्त चिंता नाही आहे. टीम इंडियाविरुद्ध खेळताना आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. दक्षिण आफ्रिकेसाठी ही यावर्षीची सर्वात मोठी मालिका आहे. भारताने याला ‘फायनल फ्रंटियर‘ बनवले आहे, पण ते यात यशस्वी होणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू, असेही ते यावेळी म्हणाले. प्रथमश्रेणीचे माजी खेळाडू कॉनरड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही मात्र, ते दक्षिण आफ्रिकेचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.

Advertisement
Tags :

.