वारणा योजनेचा प्रस्ताव 15 दिवसांत शासनाकडे! आयुक्त सुनील पवारांची ग्वाही
मदनभाऊ युवा मंचच्या आंदोलनास यश : सर्व पक्षीय नेत्यांची शिष्टाई यशस्वी
सांगली प्रतिनिधी
महापालिकेच्या वारणा उद्भव योजनेला खोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांना चांगलाच दणका बसला आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये या योजनेचा प्रस्ताव शासनास सादर कऊ, अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी दिली. या मागणीसाठी मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी बेमुदत उपोषण सुऊ केले होते. याची दखल घेत सर्व पक्षीय नेत्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी प्रस्ताव सादर करण्यास सकारात्मकता दर्शविली. त्यानंतर लेंगरे यांनी उपोषण मागे घेतले.
वारणा नदीमधून सांगलीस पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा उद्भव योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी 250 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वारणा नदीमधून पाणी उपसा करण्याची परवानगीही मिळाली आहे. टंकवेल, जॅकवेलसाठी समडोळी-सांगलीवाडी सीमेवर ‘कोळकी’ येथे दोन एकर जागेचे करारपत्रही करण्यात आले sआहे. हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ सुऊ आहे. तसेच योजना अंतिम टप्प्यात असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत चांदोली योजनेचा घाट घातला आहे.
दरम्यान, वारणा योजना स्व. मदनभाऊ पाटील यांचे स्पप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी मदनभाऊ युवामंचने पुढाकार घेतला. योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी होणारी टाळाटाळ लक्षात घेत युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी सोमवार चार डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या शाळा क्रमांक एकच्या इमारतीसमोर लेंगरे यांनी उपोषण सुऊ केले. भाजपचे लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, काँग्रेस नेत्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी उपोषणस्थळी भेट दिली.
लेंगरे यांच्याशी चर्चा केली. योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका लेंगरे यांनी घेतली. यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्याशी चर्चा केली. येत्या पंधरा दिवसांमध्ये योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर कऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. लेंगरे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर लेंगरे यांनी उपोषण मागे घेतले. आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्हा पानपट्टी असोशिएशन, सांगली- मिरज कॉन्ट्रॅक्टर संघटना, रिक्षा संघटना, गणेश मार्केट गाळेधारक संघटना, नाभिक संघटना, रेशनिंग कृती सामिती, सुशिक्षित बेरोजगार संघटना, विष्णूअण्णा पाटील खरेदी-विक्री संघ, पद्माळे ग्रामपंचायत, समस्त मुस्लिम समाज आदींनी उपोषण स्थळी येत आंदोलनास पाठींबा दिला.
यावेळी डॉ. सिकंदर जमादार, किशोर शहा, संग्रामदादा पाटील, प्रकाश मुळके, संतोष पाटील, फिरोज पठाण, अमर निंबाळकर, उदय पाटील, शीतल लोंढे, शेखर पाटील, पद्माळे गावचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ कोळी, ज्ञानेश्वर पाटील, अमित लाळगे, अमोल झांबरे, महेश कर्णे, प्रवीण निकम, जयराज बर्गे, शहाजी सरगर, दिनेश सादिगले, अक्षय दोडमनी, शरद गाडे, धनंजय खांडेकर, आय्यज मुजावर, राजू निंबाळकर, महेश पाटील, संकेत आलशे, प्रथमेश भंडे, मयुरेश भिसे, धनाजी केंगार, दीपक गुडे, सचिन सरगर आधी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महानगर पालिका क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजना पूर्ण होणारच...!
महापालिका प्रशासनाने वारणा योजनेचा प्रस्ताव 15 दिवसांमध्ये शासनाकडे सादर करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले आहे. प्रशासनाकडे 15 दिवस आहेत, यामध्ये त्यांनी तातडीने कार्यवाही करावी. काही त्रूटी असतील तर त्या दूर करतील. आयुक्तांनी शब्द दिला आहे. त्यांच्यावर विश्वास आहे. ही योजना येणाऱ्या काळात पूर्ण होईलच.
आनंदा लेंगरे, अध्यक्ष, मदनभाऊ पाटील युवामंच. सांगली