महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वर्ल्डकप सेमीफायनलसाठी पंचांची घोषणा

06:22 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेची साखळी फेरीतील सामने रविवारी संपले. आता, स्पर्धेच्या अखेरच्या आठवड्यांमध्ये दोन उपांत्य फेरी व अंतिम सामना खेळला जाईल. दरम्यान, सोमवारी उपांत्य फेरीसाठी आयसीसीने पंचांची व सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

Advertisement

टीम इंडिया व न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ व रॉड टकर हे मैदानी पंच म्हणून काम पाहतील. तर तिसरे पंच म्हणून जोएल विल्सन तर चौथे पंच ऍड्रियन होलस्टोक असणार आहेत. अँडी पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी असणार आहेत. तसेच दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल. या सामन्यात रिचर्ड केटलबरो व भारताचे नितीन मेनन हे मैदानी पंच असणार आहेत. तिसरे पंच म्हणून ख्रिस गॅफनी व चौथे पंच मायकल गॉ असतील तर सामनाधिकारी म्हणून भारताच्या जवागल श्रीनाथ यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#Sport
Next Article