महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लष्करी अग्निवीर भरती प्रक्रियेत किरकोळ बदल

06:41 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काही पदांसाठी टायपिंग चाचणी आवश्यक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय लष्कराने अग्निवीर भरतीबाबत काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. आता नव्या सत्रात अग्निवीरला काही पदांसाठी टायपिंगची परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियम अग्निवीर लिपिक आणि स्टोअरकीपर श्रेणीसाठी लागू होईल. इंग्रजी आणि हिंदीसाठी प्रतिमिनिट 35 आणि 30 शब्दांची चाचणी घेतली जाऊ शकते. नियमांची माहिती देण्यासाठी लष्कर मोहीम राबवत आहे. या अंतर्गत भरतीच्या नवीन नियमांची माहिती दिली जाणार आहे. हा नवीन बदल 2024-25 पासून लागू केला जाईल. भारतीय लष्कराने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. लष्कर भरती मंडळाला पत्र पाठवून त्याचे पालन सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टायपिंगचा दर्जा नवीन असेल की पूर्वीसारखा असेल, त्याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. मात्र, भरती प्रक्रियेतील या बदलाबाबत आर्मी रिक्रूटमेंट बोर्ड डायरेक्टरेटच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

भारतीय लष्कराच्या नियमांनुसार, अग्निवीर लिपिक आणि स्टोअरकीपर या पदासाठी केवळ 12वी उत्तीर्ण युवकच पात्र आहेत. यासाठी 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेचे विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच प्रत्येक विषयात 50 टक्के गुण असणे बंधनकारक आहे, अशीही अट आहे. लिपिक आणि स्टोअर कीपरसाठी वय 17 ते 21 वर्षे दरम्यान असावे. लिपिक पदासाठी इंग्रजी, गणित, अकाऊंट्स आणि बुक किपिंग या विषयांची माहिती असणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article