महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लखनौचा बेंगळूरवर 28 धावांनी विजय

06:58 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डी कॉक, पूरन यांची फटकेबाजी, सामनावीर मयांक यादवचे 3 बळी, आरसीबीचा तिसरा पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 28 धावांनी पराभव करत गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. बेंगळूर मात्र नवव्या स्थानावर कायम असून त्यांचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव आहे.

प्रथम खेळणाऱ्या लखनौने बेंगळूरला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले होते. डी कॉक आणि निकोलस पूरन यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर लखनौने 20 षटकात 5 बाद 181 धावा जमविल्या. त्यानंतर आरसीबीचा डाव 19.4 षटकात 153 धावात गुंडाळून विजय साकार केला.

बेंगळूरच्या डावामध्ये सलामीच्या कोहलीने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22, कर्णधार डु प्लेसीसने 13 चेंडूत 3 चौकारांसह 19, रजत पाटीदारने 21 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 29, रावतने 21 चेंडूत 11, लोमरोरने 13 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह सर्वाधिक 33, मोहम्मद सिराजने 8 चेंडूत 2 षटकारासह 12 धावा जमविल्या. लखनौ सुपरजायंट्सचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले. त्यांच्या खेळाडूंनी डु प्लेसीस आणि डागर यांना धावचीत केले तर पूरन व देवदत्त पडिक्क्ल यांनी प्रत्येकी 3 झेल टिपले. लखनौतर्फे मयांक यादवने 14 धावात 3, नवीन उल हकने 25 धावात 2, सिध्दार्थ, यश ठाकुर, स्टोईनीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.  बेंगळूरच्या डावामध्ये 8 षटकार  आणि 11 चौकार नोंदविले गेले. बेंगळूर संघाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 48 धावा जमविताना 3 गडी गमविले. बेंगळूरचे अर्धशतक 37 चेंडूत, शतक 81 चेंडूत, तर दीडशतक 114 चेंडूत फलकावर लागले.

तत्पूर्वी या सामन्यात बेंगळूरने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी दिली. डी कॉक आणि कर्णधार के. एल. राहुल यानी डावाला दमदार सुरूवात करून देताना 33 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने राहुलला डागरकरवी झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 2 षटकारासह 20 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला देवदत्त पडीक्कलही अपयशी ठरला. तो सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 6 धावा जमविल्या. डी कॉकला स्टोईनीसकडून बऱ्यापैकी साथ लाभली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर स्टोईनीस झेलबाद झाला. त्याने 15 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. डावातील 17 व्या षटकात डी कॉक टॉपलेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 56 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांसह 81 धावा झोडपल्या. डी कॉक बाद झाल्यानंतर निकोलस पूरनच्या शेवटच्या दोन षटकातील फटकेबाजीमुळे लखनौला 181 धावापर्यंत मजल मारता आली. बडोनी खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. निकोलस पूरनने डावातील 19 व्या षटकात टॉपलेला सलग तीन षटकार तर शेवटच्या षटकात सिराजला आणखी दोन षटकार ठोकले. पूरनने 21 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 40 धावा झोडपल्या. लखनौच्या डावामध्ये 14 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बेंगळूरतर्फे मॅक्सवेलने 2, तर टॉपले, दयाल, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

लखनौने पॉवरप्लेच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 1 गडी गमविला. लखनौचे अर्धशतक 32 चेंडूत, शतक 72 चेंडूत, दीडशतक 110 चेंडूत फलकावर लागले. लखनौला अवांतर 10 धावा मिळाल्या. डी कॉकने 36 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. डी कॉक आणि स्टोईनीस यानी 30 चेंडूत 56 धावांची भर घातली.

संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपरजायंट्स : 20 षटकात 5 बाद 181 (डी कॉक 81, के. एल. राहुल 20, पडिक्कल 6, स्टोईनीस 24, पूरन नाबाद 40, बडोनी 0, कृणाल पंड्या नाबाद 0, अवांतर 10, मॅक्सवेल 2-23, टॉपले 1-39, दयाल 1-24, सिराज 1-47). रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 19.4 षटकात सर्वबाद 153 (कोहली 22, डु प्लेसीस 19, पाटीदार 29, ग्रीन 9, रावत 11, लोमरोर 33, कार्तिक 4, मोहम्मद सिराज 12, टॉपले नाबाद 3, अवांतर 11, मयांक यादव 3-14, नवीन उल हक 2-25, सिध्दार्थ 1-21, ठाकुर 1-38, स्टोईनीस 1-9).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article