महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष्य सेन, सायना दुसऱया फेरीत

07:32 AM Jan 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
India's Lakshya Sen returns a shot to Japan's Kodai Naraoka during the men's single match in the Indonesia Masters badminton tournament in Jakarta, Indonesia, Wednesday, Jan. 25, 2023. (AP/PTI)(AP01_25_2023_000072B)
Advertisement

वृत्तसंस्था/ जकार्ता

Advertisement

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन व सायना नेहवाल यांनी येथे सुरू झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.

Advertisement

Jakarta:Saina Nehwal of India returns a shot to Pay Yu-po of Taiwan during the women's single match in Jakarta, Indonesia, Wednesday, Jan. 25, 2023 (AP/PTI)(AP01_25_2023_000144B)

मागील दोन आठवडय़ात झालेल्या मलेशिया व इंडिया ओपन स्पर्धेत लक्ष्य सेनला सुरुवातीलाच स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. पण यावेळी त्याने शानदार प्रदर्शन करीत जपानचा नवा सेन्सेशनल खेळाडू कोदाइ नाराओकाचा 21-12, 21-11 असा पराभव केला. इंडिया ओपनची दुसरी फेरी गाठलेल्या सायना नेहवालला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने चिनी तैपेईच्या पाय यु पो हिचा 21-15, 17-21, 21-15 असा पराभव केला. सातव्या मानाकित लक्ष्य सेनची पुढील लढत मलेशियाच्या एन्ग त्झे याँगशी तर सायनाची लढत झांग यि मान किंवा आठव्या मानांकित हा युइ यापैकी एकीशी होईल. माजी अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांतने दुसऱया गेममध्ये 18-15 ची मिळविलेली आघाडी व दोन गेमपॉईंट वाया घालविल्याने त्याला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून 10-21, 22-24 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article