रोबोटच्या मदतीने इंडस्ट्रिजचा विस्तार
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
जगभरातील विविध क्षेत्रे आज तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये इंटरनेट, चिपसह अन्य गोष्टींचा वापर वाढत गेल्याने काळानुसार उद्योग क्षेत्रालाही बदलता येत आहे. यामध्ये क्रांतीकारी बदल म्हणजे रोबोट्ची झालेली निर्मिती होय.
सध्या रोबोट्सह अन्य नवीन गोष्टी बदलत असल्याचे वेगाने समोर येत आहे. ज्यामध्ये काही भितीदायक, तर काही दिलासा देणाऱया आहेत. रोबोट मानवी जीवनात जवळपास 6 दशकांपासून उपलब्ध आहे. यांत्रिकी मानवी स्वरुपात रोबोट दिलेल्या सुचनेच्या आधारे काम करत आहेत. मानव आणि रोबोट यांच्यात चांगले नाते निर्माण होत असून रोबोटिक्सच्या तज्ञांच्या पॅनेलनुसार रोबोटचा वापर आता उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
रोजगार निर्मितीसह ई-कॉमर्समध्ये तेजी
कोरोनाच्या संकटामुळे मानवी जीवनात व्यवहाराच्या पद्धती बदलत गेल्याचे दिसून आले. जगामधील लाखो लोकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. कोरोना काळात अनेकांना घरातून काम करावे लागले होते. परिणामी रोजगारात घट झाली तर विविध व्यावसायिक कर्मचाऱयांची मोठी अडचण निर्माण झाली होती. दुसरीकडे ई कॉमर्समध्ये मात्र तेजीचा माहोल राहिला होता. हा बदल स्विकारण्यास रोबोटसह अन्य तंत्रज्ञानाची मदत झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
कोरोना काळात विविध उद्योगांमध्ये रोबोट्सचा वेगाने वापर वाढला. अवघड व अडचणीचे काम अगदी सोप्या पद्धतीने रोबोट्स अत्यंत उत्तमपणे करत असल्याचे दिसून आले. यामध्ये वाहनांचे उत्पादन, अवघड शस्त्रक्रीया, जोखमीची कामे, तसेच उद्योग क्षेत्रातील कामासाठी रोबोट्सचा वापर अधिक प्रमाणात केला जात असल्याची माहिती आहे.
हेनरिक क्रिस्टेंसन यांच्या माहितीनुसार मानवाविना कारखाना ही संकल्पना अलीकडच्या काळात जोर पकडत आहे. याचा वापर झाल्यास आगामी काळात पुन्हा रोजगाराची समस्या उदभवू शकते, असाही अंदाज मांडला जात आहे.
जगात 30 लाखांपेक्षा अधिक इंडस्ट्रीयल रोबोट्स
जगभरात रोबोट्सशी संबंधीत असणाऱया इंडस्ट्रिजची जागतिक संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या मते, 30 लाखापेक्षा अधिकचे इंडस्ट्रिज रोबोट्स विकसित झाले आहेत. तसेच लाखो अन्य रोबोट वेअरहाऊसमध्ये साहित्याची देवाणघेवाण करत असतात, यामध्ये घरातील स्वच्छता, लॉनची सफाई तसेच शस्त्रक्रियेला मदत करण्याचे कामही रोबोट्स अलीकडे करत असल्याची माहिती आहे.
अत्याधुनिक प्रकल्पात रोबोट्सचा वापर
जगात सर्वाधिक प्रगत अशा अत्याधुनिक प्रकल्पांमध्ये 10 कामगारांच्या ठिकाणी एका रोबोट्सचा वापर होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या कॉन्टेक्चुअल रोबोटिक्स इान्स्टिटय़ूटचे संचालक