कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रियल माद्रिदच्या विजयात बेन्झेमाची चमक

02:43 AM Jun 20, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रिद

Advertisement

करिम बेन्झेमा व मार्को असेन्सिओ यांनी नोंदवलेल्या गोलांच्या बळावर रियल माद्रिदने येथे झालेल्या ला लिगातील सामन्यात व्हॅलेन्सियाचा 3-0 असा पराभव केला. असेन्सिओने वर्षभराच्या कालावधीत पहिला गोल नोंदवला तर बेन्झेमाने अप्रतिम व्हॉलीवर नोंदवलेला दुसरा गोल हा ला लिगामधील सर्वोत्तम गोल असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

बेन्झेमाने एडन हॅझार्डच्या साथीने पहिला व दुसरा गोलही नोंदवला. मात्र पूर्वार्धात व्हॅलेन्सियाचा खेळ सरस झाला. त्यांच्या रॉड्रिगो मॉरेनोने मारलेला फटका गोलपोस्टला लागून गेला तर एक गोल व्हीएआरच्या माध्यमातून रद्द करण्यात आला. ब्रेकनंतर मात्र माद्रिदने खेळ उंचावत शानदार विजय नेंदवला. बार्सिलोनापेक्षा ते आता केवळ दोन गुणांनी मागे आहेत. बार्सिलोनाचा पुढील सामना सेव्हिलाशी होत आहे. बेन्झेमाचा दुसरा गोल मात्र आश्चर्यकारक होता. त्याने उंचावरून आलेल्या चेंडूवर हवेतच एका पायाने ताबा मिळविला आणि दुसऱया पायाने जबरदस्त व्हॉली मारत त्याला गोलजाळय़ाची अचूक दिशा दिली. दुखापतीतून सावरल्यावर गेल्या वर्षीच्या 10 जूननंतर असेन्सिओ प्रथमच खेळत होता. 74 व्या मिनिटाला मैदानात उतरल्यानंतर 31 व्या सेकंदालाच त्याने पहिल्या स्पर्शातच गोल नोंदवला. रियल माद्रिदतर्फे सर्व स्पर्धांत मिळून बेन्झेमाचे 243 गोल झाले असून क्लबतर्फे विक्रम नोंदवणाऱयात तो फेरेन्क पुस्कासला मागे टाकत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article