राष्ट्रपतींच्या नेदरलँड दौऱयात चार करारांवर स्वाक्षऱया
07:00 AM Apr 08, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
**EDS: IMAGE MADE AVAILABLE FROM RASTRAPATI BHAWAN ON THURSDAY, APRIL 7, 2022** Amsterdam: President Ram Nath Kovind in a group photograph at the Indian community reception during his visit to Netherlands. (PTI Photo) (PTI04_07_2022_000042B)
Advertisement
ऍम्स्टरडॅम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेदरलँड दौऱयादरम्यान भारत आणि नेदरलँडमध्ये 4 करारांवर स्वाक्षऱया झाल्या. पहिला करार हा बंदरे, सागरी वाहतूक आणि या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावरील कराराचा विस्तार आहे. तर दुसरा करार केरळ आणि नेदरलँड्सच्या राष्ट्रीय अभिलेखागारांसोबत सामायिक सांस्कृतिक वारसा कराराचा विस्तार आहे. तिसरा करार लीडेन युनिव्हर्सिटी आणि केरळ कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च यांच्यात झाला आहे. चौथा करार कृषी विषयक असून तो भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाशी संबंधित असल्याची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या विदेश दौऱयावर आहेत. 34 वर्षांनंतर भारतीय राष्ट्रपतींची ही नेदरलँडची भेट आहे. नेदरलँडला जाण्यापूर्वी त्यांनी सिंगापूरला भेट दिली होती. या सिंगापूर दौऱयातही त्यांनी विविध करारांवर स्वाक्षरी केली होती.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article