राशी भविष्य
बुधवार दि.27 जानेवारी ते मंगळवार दि.2 फेब्रुवारी 2021
धनदा गुरुपुष्यामृत योगावरील शाकंभरी पौर्णिमा
पौष महिन्यातील पौर्णिमेला गुरुपुष्यामृत नक्षत्र येणे व त्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा म्हणजे राजयोग, अमृतयोग असे अनेक शुभयोग होतात. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीची अत्यंत आवडती तिथी. या दिवशी जे कुणी शास्त्राsक्त लक्ष्मीपूजन करतील, त्यांच्यावर संपूर्ण वर्षभर लक्ष्मीची कृपा राहते. देवांचा धनाधिपती कुबेर याच्या मालकीचं पुष्यनक्षत्र गुरुपुष्यामृत योगावर आहे. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन धनधान्याची समृद्धी, पैसाअडका, भाग्योदय, नोकरीविषयक यश, आरोग्य सुधारणा, कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करते. दुर्गासप्तशती पाठामध्ये या शाकंभरी देवीचे महत्त्व वर्णन केलेले आहे. कोणत्याही महत्त्वाच्या व्यावहारिक शुभ कामाला हा दिवस चांगला आहेच, पण त्याहीपेक्षा सप्तशती पाठ, देवीवर कुंकुमार्चन करणे, श्रीसूक्त वाचन यासह देवीशी संबंधित कोणतीही पूजा या दिवशी जरूर करावी. असा योग वारंवार येत नसतो. यादिवशी शाकंबरी सहस्त्रनाम मुद्दाम वाचावे. ते मिळत नसल्यास देवी सहस्रनाम वाचले तरीही चालू शकते. उद्या 28 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे. कोल्हापूरची अंबाबाई आणि बदामी बनशंकरीदेवी यांच्यात बरेच साम्य दिसून येते. अत्यंत पवित्र स्थानामध्ये बदामी बनशंकरीचा वरचा क्रमांक आहे. अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवंतिका, द्वारका याशिवाय करवीर हंपी येथील विरुपाक्ष, आंध्रातील श्रीशैल, पंढरपूर, तिलक बनशंकरी, सेतुबंध ही क्षेत्रे काशी प्रमाणेच श्रे÷ आहेत. त्यातही श्री बनशंकरी क्षेत्र सर्वात श्रे÷ आहे असे श्री शाकंभरी देवी महात्म्य या पुस्तकात दिलेले आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक जण आपापल्या कुलदेवीचे पूजन करीत असतो, पण देवाकडे आपला व परका हा भेदभाव नसतो. देव एकच असतो, पण प्रसंगानुरुप देवाने अथवा देवीने निरनिराळे अवतार धारण केलेले असतात. शाकंभरी अथवा बनशंकरी ही चारही वर्णाची कुलदेवता आहे व तिचे पूजन फार लवकर फळते असे अनेकजण बोलून दाखवीत असतात. अन्नधान्य समृद्धी व सर्व प्रकारच्या भाज्यांवर या देवीचा अंमल असतो. त्यामुळे उपजीविका होत नसेल, घरी अन्नधान्य पुरत नसेल, पैसा पुरवठय़ाला येत नसेल, कुटुंबात शांती-समाधान नसेल तर शाकंभरी देवीची आराधना करतात. पौष मासात या देवीचे आत्यंतिक महत्त्व वर्णिले गेले आहे.
मेष
स्वतंत्र व्यवसाय करणारा लाभदायक योग. नोकरी करणाऱयांनी मात्र जपून राहावे. कला क्षेत्रातील लोकांना आठवडा तेवढा खास नाही. बुद्धिजीवी वर्गाला प्रतिस्पर्ध्याशी सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन मध्यम राहील. सामाजिक क्षेत्रात असाल तर नवीन काहीतरी करून दाखवाल. विद्यार्थ्यांनी अवांतर गोष्टीकडे लक्ष न देता अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. वृद्धांनी आरोग्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी.
वृषभ
सामाजिक क्षेत्र असेल तर काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मित्रमंडळी आणि भावंडे काही बाबतीत विरोध करण्याची शक्मयता आहे. शेअर बाजार संबंधित असाल तर पूर्ण विचार करूनच गुंतवणूक करा. आर्थिक लाभाची शक्मयता कमी आहे. कोर्टकचेऱया वगैरेसाठी ग्रहमान अनुकूल नाही. काहीजणांना अचानक दूरचे प्रवास घडतील. या आठवडय़ात कोणतीही नवी जबाबदारी स्वीकारणे जरा अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
मिथुन
अष्टमातील रवि-शनिचा योग चांगला नाही. आरोग्याची काळजी घ्या. कुणाशीही वादावादी, तंटेबखेडे करू नका. आर्थिक बाबतीत मात्र हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. कमी श्रमात मोठे धनलाभ होतील. नोकरी, उद्योग, व्यवसाय जोरात चालेल. गुरुची दृष्टी धनस्थानावर असल्याने कोणत्याही बाबतीत आर्थिक अडचण पडणार नाही, पण कुणाच्याही कोणत्याही प्रकरणात शक्मयतो भाग घेवू नका. तसेच जामीनकी, मध्यस्थी यापासून दूर रहा. इतर बाबतीत ग्रहमान उत्तम आहे.
कर्क
आर्थिकदृष्टय़ा हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील. त्यामुळे कमाई व खर्च याचे गणित व्यवस्थित ठेवा. अचानक पाहुणेमंडळी येण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक जीवन उत्तम राहील. कुटुंबातील व्यक्तीशी सामंजस्याने व योग्य विचारविनिमय करून वागा. त्यामुळे अनेक अडचणीतून मार्ग निघेल. वैवाहिक जीवनात काही किरकोळ प्रसंग निर्माण होतील, पण त्यातून काहीतरी मार्ग निघेल. नोकरवर्गाला कामाचा ताण वाढणार आहे. सध्याच्या कामाव्यतिरिक्त अनेक नवीन कामेही करावी लागतील. त्यामुळे जरा चिडचिड होण्याची शक्मयता आहे.
सिंह
नोकरदार व स्वतंत्र व्यवसायिकांना उत्तम काळ आहे, पण आर्थिक व्यवहारात जपून राहावे लागेल. घाईगडबडीत ‘ध’ चा ‘मा’ होऊ शकतो. विद्यार्थीवर्गाला अनुकूल काळ आहे. काही अडचणी असतील तर त्या या आठवडय़ात दूर होतील. प्रेमी जनासाठी हा सप्ताह सावध राहण्यास सुचवीत आहे. उतावळेपणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रति÷sलाही धोका पोचू शकतो. या आठवडय़ात जुनी खोळंबलेली कामे पूर्ण करा. कोठेही अडचण येणार नाही.
कन्या
आर्थिक बाबतीत चांगले योग. जुनी येणी वसूल होतील. कोर्ट प्रकरणात अडचणी अथवा विलंब होऊ शकतो. भागिदारी व्यवसाय असेल तर त्यात फाटाफूट होण्याचे योग. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी आल्या तरी पुढे मोठे यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर अनुकूल काळ आहे. विवाहाच्या वाटाघाटीत अपेक्षित यश मिळेल. कोणत्याही तिऱहाईताला मात्र हस्तक्षेप करण्यास अथवा मधे बोलण्यास वाव देऊ नका. काही जुनी प्रकरणे कायमची मिटू शकतील.
तूळ
सर्वच गोष्टी मनासारख्या होतीलच असे नाही. त्यामुळे मानसिक शांती ढळण्याची शक्मयता आहे. एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्यामुळे कामाचा गोंधळ होईल. नोकरी-व्यवसायात तुमच्या शब्दाला महत्त्व दिले जाईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. वाहन व वास्तुविषयक व्यवहार यशस्वी होतील. कर्जप्रकरण तसेच जामिनकी यापासून सावध राहावे लागेल. पूर्वी फिस्कटलेले काही व्यवहार या आठवडय़ात पूर्ण होतील. त्यामुळे नवीन कामे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
वृश्चिक
कामाचा ताण वाढल्याने प्रकृतीवर परिणाम होईल. काही बाबतीत भावंडांच्याकडून निराशा पदरी पडेल. शेती, बागायती असेल तर किरकोळ नुकसान होण्याची शक्मयता आहे. कमाईपेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. व्यापारधंद्यात प्राप्ती वाढली तरी पैसा हाती राहीलच याची शक्मयता नाही. नोकरीत वरि÷ांचा विश्वास कमवाल. अविवाहितांचे विवाह अनपेक्षितरित्या ठरतील. आयुष्यात नवी नाती निर्माण होतील. या आठवडय़ात प्रकृतीची याची काळजी घ्या.
धनु
काही जुने आजार उद्भवतील. कापणे, भाजणे, पडणे असे प्रकार होण्याची शक्मयता. काही गुप्तशत्रंtच्या कारवायांमुळे मनस्ताप होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेपेक्षा उत्तम यश मिळेल. नोकरदार व व्यवसाय करणाऱयांना कामाची नवीन संधी मिळेल. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी व्हाल. किमती वस्तूंची चोरी व फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. काही तातडीच्या चिंतांचे आपोआप निवारण होईल. कलावंत, लेखक, नटय़ा, चित्रपट, समीक्षक यांना उत्तम काळ. बेकारांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. कौटुंबिक व सामाजिक जीवनात काही निर्णय स्वतंत्र बुद्धीने घ्यावे लागतील.
मकर
रवि-शनि योगामुळे साधी कामेही लवकर होणार नाहीत. व्यापार-उद्योग धंद्यात मंदी जाणवेल. कोर्ट दरबारात मात्र यश मिळेल. सध्याच्या नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्मयता. नोकरीत बदलीची शक्यता आहे. काही बाबतीत रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक समजावे. बुद्धी क्षेत्रातील व्यक्ती असाल तर मोठी प्रगती झालेली दिसून येईल. अल्पश्रमात विशेष लाभ. धार्मिक श्रद्धा वाढेल. अविवाहितांचे विवाह जुळतील. काहीजणांना दूरचे प्रवास, तसेच प्रेमप्रकरणात यश मिळेल. वयस्कर व्यक्तींनी आरोग्याची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंभ
मित्र-मैत्रिणींकडून मोठे लाभ होतील. कौटुंबिक जीवनातील काही अडचणी कमी होतील. हाती घेतलेली कामे रेंगाळत ठेवू नका. गरजेच्या मानाने आर्थिक आवक कमी राहील. राहत्या घराचे काही प्रश्न त्रासदायक ठरण्याची शक्मयता. वडीलधाऱया मंडळींचे आरोग्य जपावे लागेल. एखाद्याच्या सांगण्यावरून गरज नसताना मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा प्रसंग येईल. एखाद्या नातेवाईकाबाबत अशुभ वार्ता कानी येतील. नोकरीत रजा अथवा बदलीची शक्यता आहे.
मीन
अर्धशिशी व नेत्रविकार यांचा त्रास होईल. मित्र-मैत्रिणी अथवा नातेवाईक यांच्याकडे अडकलेली रक्कम परत मिळेल. महत्त्वाचे करारमदार यशस्वी होतील. धंदा, व्यवसाय जोरात चालेल. कुटुंबातील मतभेद अचानक उफाळून वर येतील. त्यामुळे गैरसमजाला वाव मिळेल. लेखक, कलाकार, क्रीडापटू यांना उत्तम काळ. नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडून येतील. बंधू-भगिनींचे काही प्रश्न असतील तर ते गंभीर स्वरूप धारण करतील. या आठवडय़ात केलेली सूर्याची आराधना चांगले फळ देऊन जाईल.