For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

क्र.          विशेष         तारीख  

Advertisement

  1. शुभ दिवस 3 दु. 4 प, 4- 4.20 प, 6- 11.32 नं, 7, 11, 13-दु. 3 प, 15 दु. 4 नं, 16, 17-स 10 नं, 18, 19, 20 दु. 1.20 प, 21,23, 26, 27, 30
  2. अशुभ दिवस 1, 2, 5, 8, 9, 10, 12, 14, 22, 24, 25, 28, 29
  3. सण/ उत्सव/ विशेष तिथी 5- रामदास नवमी, 6 व 7- स्मार्थ व भागवत विजया एकादशी, 8- महाशिवरात्र, 10- सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, 12- रामकृष्ण परमहंस जयंती, 16- होलाष्टक आरंभ (शुभ कार्य वर्ज्य) , 20- अमलकी एकादशी, 24- हुताशनी (होळी) पौर्णिमा (दहनाचा शुभ मुहूर्त 11:13 ते 12:27 पर्यंत ) , 25-धुलीवंदन (धुळवड), 27- तुकाराम महाराज बीज, 28- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रा. 09.27),
  4. 29- गुड फ्रायडे, 30- रंगपंचमी
  5. अमावप्स्या/ पौर्णिमा अमावप्स्या- 09-03-2024 सायंकाळी 06.18 ते 10-03-2024 दुपारी 02.30 पर्यंत पौर्णिमा 24-03-2024 सकाळी 09.56 ते 25-03-2024 दुपारी 12.30 पर्यंत
  6. साखरपुड्याचे मुहूर्त 3- दु. 4 प, 6- दु. 3 नं, 7, 11, 13 - दु. 3 प, ( होलाष्टक- आपत्कालीन  : 16, 17 सायं. 5 प, 18- स 6 नं, 19, 20 दु. 1 प, )26- दु. 2 प
  7. बारसे (नाव ठेवण्याचे) मुहूर्त 3-दु. 4 प, (होलाष्टक- आपत्कालीन  :16, 17, 19) 26 दु. 3 नं, 27, 30
  8. जावळाचे मुहूर्त 13, 17- स 10 नं, 20 - दु. 1 प, 27
  9. भूमीपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त 6 - स 11.32 ते दु. 4 प, 7- स 08.23 नं, 16- सा 4 प, 20- दु. 1 .19 प, 21- सा 4 प, 23- स 07.17 नं, 30- सा 4 प
  10. गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहूर्त) 3, 7, 11, (होलाष्टक- आपत्कालीन  :16, 17- स 10 नं), 27, 30
  11. वास्तूशांतीचे मुहूर्त(व्यावहारिक) 7- स 08.23 प,(होलाष्टक- आपत्कालीन  : 16- सा 4 प, 20- दु. 01.19 प), 27- सा 4 प, 30- सा 4 प
  12. व्यापार सुऊ करण्याचे मुहूर्त 3, 6, (होलाष्टक- आपत्कालीन  :17, 20- दु.1 प), 27
  13. वाहन खरेदीचे मुहूर्त (होलाष्टक- आपत्कालीन  :20- दु.1 प), 27
  14. शेत जमीन/जागा/प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त (होलाष्टक- आपत्कालीन  :20- दु. 1 प), 27
  15. शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 3, 8, (होलाष्टक- आपत्कालीन  :21), 26, 27
  16. डोहाळे मुहूर्त         13- दु. 3 प, 17 - सा 5 प, (होलाष्टक- आपत्कालीन  :18, 19, 20- दु.1 प), 26 - दु.2 प
  17. पंचक शुक्रवार 08-03-2024 रात्री 09.18 ते मंगळवार 12-03-2024 रात्री 08.30 पर्यत

मेष 

तीर्थयात्रेला जाण्याचे योग होत आहेत. उसने दिलेले पैसे परत मिळवण्याकरता योग्य काळ आहे. तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नसली तरी छोटे मोठे आजार त्रास देऊ शकतात. या काळात कौटुंबिक कलह होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. मातृतुल्य व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. जमिनीचा व्यवहार सध्या टाळा. ऑफिसमध्ये वातावरण असंतुलित असेल.

Advertisement

उपाय : लाल रंगाच्या गाईला चारा घाला

वृषभ 

तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे. विशेषत: पोटाचे विकार आणि संसर्गजन्य रोग त्रास देऊ शकतात. योग्य वैद्यकीय उपाययोजना करा. धनप्राप्तीच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. अनपेक्षित ठिकाणाहून संधी   मिळतील. कुटुंबात एकोपा असेल. प्रवासाचे योग होत आहेत. नोकरदार वर्गाला  चांगली बातमी कळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

उपाय : आंघोळीच्या पाण्यात  चिमूटभर  हळद टाका.

मिथुन 

घरातील इतर लोकांशी तुलना केली तर तुमची तब्येत सुधारल्यासारखी वाटेल.  प्रवासाला जाणे यावेळी टाळलेले बरे. कारण यातून तब्येतीचे नुकसान आणि आर्थिक फटका बसू शकतो. कोणत्याही वाद विवादाला सामोरे जाऊ नका.   तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. प्रेम संबंधांमध्ये चांगले यश मिळेल. कलाकारांना आणि खेळाडूंना उत्तम काळ आहे.

उपाय : आवळ्याच्या झाडाला कच्चे सूत बांधावे.

 कर्क 

लहान सहान कारणावरून घरात होणाऱ्या भांडणामुळे वीट येऊ शकतो.   आर्थिक प्राप्ती करता अथक प्रयत्न करावे लागतील. अपेक्षा नसलेल्या ठिकाणी  नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. सावध रहा. जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीच्या संबंधी महत्त्वाचे व्यवहार करण्याकरता योग्य काळ आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळू शकतो.

उपाय : देवीच्या मंदिरामध्ये  पाच केळी  घेऊन जावे

 सिंह

बाहेरून कितीही काटक दिसत असला तरी सध्याच्या काळामध्ये इम्युनिटी कमी झाल्यामुळे लहान मोठ्या आजारांचा त्रास होऊ शकतो. स्वत:च्या रागावरती  नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असेल. ऑफिसमध्ये काही कामांना वेळ लागल्यामुळे चिडचिड होईल. एका विशिष्ट कामाकरता प्रवासाचे योग आहेत. गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारचा फायदा होण्याची शक्मयता आहे.

उपाय : शिंगे  नसलेल्या गायीची सेवा करा.

कन्या 

कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने आणि आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. एखादा निर्णय घेताना घरातील सगळ्यांचे मत विचारात घेणे  फायद्याचे ठरेल. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवरती थोडे नियंत्रण ठेवणे  गरजेचे आहे, पुढे जाऊन याचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक किंवा व्यावसायिक कामाकरता प्रवास करावा लागू शकतो, या प्रवासातून फायदा होईल.

उपाय : औदुंबराला हिरवा दोरा बांधा

 तूळ

पूर्वीच्या मानाने या काळामध्ये तब्येतीच्या तक्रारी कमी असतील. या काळात धनप्राप्तीच्या बाबतीमध्ये सगळ्यात भाग्यवान असाल. कुटुंबाकरता काहीतरी करण्याची संधी मिळेल. घरातील सदस्यांमध्ये वादावादी कमी होतील. पुढील काळात प्रवासाकरता प्लॅनिंग कराल. प्रॉपर्टीच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.  वाहनाकरता खर्च होईल.

उपाय : मारूतीच्या  देवळात  नारळ ठेवावा 

वृश्चिक 

बऱ्याच दिवसानंतर तब्येत सुधारल्याने बरे वाटेल आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होईल, पण त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात येत आहे. मनातले विचार साध्य करण्याकरता कष्ट करावे   लागतील. तुमच्या बोलण्याचा इतर लोक वेगळा अर्थ काढू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये वादावादीचे प्रसंग येऊन. कटूता येऊ शकते.

उपाय : लिंबाच्या झाडाला पाणी घालावे.

धनु

पैशांवरून घरामध्ये छोटी मोठी भांडणे होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे वागणे कुटुंबातील शांतीचा भंग करू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. घरातील एखाद्या व्यक्तीला लागणे, कापणे, भाजणे  यासारख्या घटनांचा सामना करावा लागू शकतो. दिलेल्या शब्द पाळाल तर नवीन संधी मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय :गायीला पालक घालावा.

मकर

कोणालाही खोटे आश्वासन देण्याच्या भानगडीत पडू नका, पुढे जाऊन ते त्रासाचे ठरू शकते. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी हे मृगजळ नाही ना याची खात्री करून घ्या. चुकीच्या सल्ल्यामुळे निर्णय चुकू शकतात आणि त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. महत्त्वाच्या बैठकीला जाण्यापूर्वी ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका.

उपाय :देवीची ओटी भरावी.

कुंभ

व्यावसायिकांना चांगल्या संधींची प्राप्ती होईल. पण त्याचबरोबर कॉम्पिटिशन देखील वाढेल. डोकेदुखी, अंगदुखीसारखे आजार त्रास देऊ शकतात. आपल्या कौटुंबिक समस्येबद्दल कोणाकडेही वाच्यता करू नका, ती व्यक्ती भरवशाची नाही आहे हे लक्षात घ्या. या काळात कोणत्याही प्रकारच्या वादविवादाला बळी पडू नका, यातून नुकसान होऊ शकते.

उपाय :काळ्या गायीला गोड चपाती घालावी

मीन 

मानसिक अवस्था थोडीशी चलबिचल असू शकते. आपल्या खिशाकडे लक्ष देऊन  खर्च केलेला केव्हाही चांगला. या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे   महागात पडू शकते. स्वत:च्या कार्यक्षमतेबद्दल विश्वास बाळगा आणि पुढे जा, यश तुमचेच आहे. आळसामुळे नुकसान होऊ शकते. तुमच्या स्वभावाला थोड्या प्रमाणात मुरड घालण्याची गरज आहे, तरच कामे वेळेवर पूर्ण होतील.

उपाय :मुंग्यांना साखर घाला.

Advertisement
Tags :

.