For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात चार अपघातात पाच ठार

06:55 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
राज्यात चार अपघातात पाच ठार
Advertisement

हडफडेत तीन पर्यटक, तर गिरी अपघातात एक युवक मृत्युमुखी, वेर्णा अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू

Advertisement

प्रतिनिधी/ म्हापसा, पणजी

राज्यात अपघातांच्या मालिका सुरूच असून चार अपघातात पाच जण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी पहाटे 3.30 ते सकाळी 10.10 वा. पर्यंत अवघ्या सात तासांमध्ये बार्देश तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. हडफडे येथे झालेल्या अपघातात तीन देशी पर्यटक ठार झाले, तर एक रशियन पर्यटक गंभीर जखमी झाला. या अपघाताचा तपास पोलिसांनी हाती घेतला होता तोच गिरी येथील नामोशी शाळेजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात आणखी एक अपघात घडला. यामध्ये खोर्जुवे येथील दुचाकीचालक विदेश पोळे नामक युवक ठार झाला. दरम्यान, वेर्णा येथील अपघातात एक सायकलस्वार ठार झाला, तर नईबाग-पोरस्कडे राष्ट्रीय महामार्गावर  वाहनचालकाला अंदाज न आल्याने ट्रक दुभाजकावर चढण्याचा प्रकार घडला. सुदैवाने अनर्थ टळला.

Advertisement

हडफडेत दोन कारमध्ये अपघात  तीन पर्यटक ठार, एक गंभीर जखमी

हडफडे येथील रशियन क्लबजवळ शनिवारी भल्या पहाटे 3.30 वाजता दोन कारच्या झालेल्या भीषण अपघातात हैदराबाद (तेलंगण) येथील दोन तर नाशिक येथील   एक पर्यटक ठार झाला व एक विदेशी पर्यटक जखमी झाला आहे. महेश शर्मा (नाशिक), दिलीपकुमार बांग आणि मनोजकुमार सोनी (दोघे रा. हैदराबाद) अशी ठार झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. तर, एथोन बिचकाव्ह (27) हा रशियन पर्यटक गंभीर जखमी झाला आहे.

रशियन पर्यटकाच्या गाडीने धडक दिल्यानंतर त्याची कार बाजूच्या खोल नाल्यात जाऊन पलटली यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हडफडे येथील रशियन क्लबजवळ हा अपघात घडला. घटनेनंतर जखमीला प्रथम म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रशियन पर्यटक गंभीर जखमी झाल्याने त्याला बांबोळी येथे गोमेकॉत पाठवण्यात आले आहे. हणजूणचे पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग आणि हवालदार रुपेश शेटगावकर यांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले आहेत.

हैदराबाद आणि पुणे येथील पाच मित्र गोव्यात पर्यटनासाठी आले होते. रात्री ते एका हडफडे जंक्शनवरील रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथून भल्या पहाटे 3.30 वाजता रेस्टॉरंटमधून बाहेर आले आणि आपल्या टीएस-06-इझेड-1816 क्रमांकाच्या कारमध्ये बसण्याच्या तयारीत होते. कारमध्ये आधी चालक आणि एकजण पुढच्या सीटवर बसले. नंतर तिघेजण पाठीमागच्या सीटवर बसण्यासाठी दरवाजा उघडत होते. इतक्यात मागच्या बाजूने जीए-03-झेड-8001  क्रमांकाची कार भरधाव वेगात आली. या कारमध्ये एथोन हा विदेशी पर्यटक होता. या कारची धडक तेलंगणच्या कारला बसली. धडक इतकी जबरदस्त होती की त्या कारमधील तिघे पर्यटक जागीच ठार झाले. दोघे किरकोळ जखमी झाले. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली याबाबत

Advertisement
Tags :

.