महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानात मतदानाचा टक्का वाढला

06:53 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

75 टक्क्यांवर मतदान : काँग्रेस-भाजपकडून विजयाचा दावा-प्रतिदावा

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत बंपर मतदान झाल्याने 75 टक्क्यांवर मतदानाची नोंद झाल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. मागील म्हणजेच 2018 मधील निवडणुकीत 74.24 टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी हाच आकडा 74.96 टक्के झाला. तसेच पोस्टल बॅलेटमधील मतमोजणीअंती 2018 मध्ये 74.71 टक्के आणि यावषी 75.45 टक्के इतके मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. एकंदर मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने आता निकालाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने जिल्हानिहाय मतदान टक्केवारीही जाहीर केली आहे. यंदाही जैसलमेरच्या पोखरण विधानसभा मतदारसंघाने पुन्हा मतदानाचा नवा विक्रम केला आहे. पोखरणमध्ये गेल्यावेळेपेक्षा जास्त मतदान झाले आहे. तेथे सुमारे 87 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनमधील बिघाडाची स्थिती राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचा दावा आयोगाने केला आहे.

काँग्रेस आणि भाजप हे राज्यातील दोन्ही मोठे पक्ष आणि राजकीय विश्लेषक बंपर मतदानाचे वेगवेगळे अर्थ लावत आहेत. मतदानानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. मतदानानंतर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी यावेळी पक्षाला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगितले. पेपरफुटीसह अनेक मुद्यांवर मतदारांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात मतदान केले आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद दोतासरा यांनी केला. तसेच त्यांनी 20 हजारांहून अधिक मतांनी विजयाचा दावाही केला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदानादरम्यान काही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी पक्ष आणि उमेदवारांच्या समर्थकांच्या उपस्थितीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र सर्वत्र त्यांची वेळीच दखल घेण्यात आली. काही ठिकाणी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. राजस्थानमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या तुरळक घटनांमध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध गुह्यांमध्ये सुमारे 77 समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article