महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजन तेली करणार भाजपला बाय-बाय

11:52 PM Oct 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी 

Advertisement

विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत वादाला आता तोंड फुटणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख ,माजी आमदार राजन तेली भाजपला राम राम करणार आहेत.ते आपल्या विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी ते आपला पक्षप्रमुख पदाचा व भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजतेय. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाड होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. श्री तेली यांनी काही दिवसापूर्वीच मी काही झालं तरी निवडणूक लढवणारच अशी गर्जना केली होती. भाजपच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबाही दर्शवला होता. मात्र त्यांनी भाजपच्या वरिष्ठांना वारंवार कळवूनही कोणतीच दखल न घेतल्याने अखेर आज दुपारनंतर त्यांनी भाजपला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चाही केल्याचे समजते.  तेली यांनी भाजपमध्ये थांबावे असेही त्यांना सूचना करण्यात आली आहे. परंतु,  राजन तेली यांनी आपला निर्णय पक्का केला असून ते भाजपला सोडचिट्टी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते मातोश्रीशी जवळीक साधण्याच्या मनस्थितीत आहेत.. उद्या शुक्रवारी सायंकाळी ते मातोश्रीवर जाणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

Advertisement
Next Article