For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोट किल्ला पुतळा चबुतरा बांधकाम सल्लागारच्या कोल्हापूरातील घरावर छापा

05:01 PM Aug 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
राजकोट किल्ला पुतळा चबुतरा बांधकाम सल्लागारच्या कोल्हापूरातील घरावर छापा
Advertisement

डॉ. चेतन एस. पाटील असे त्यांचे नाव; कोल्हापूरातील जुना राजवाडा आणि सिंधुदुर्ग पोलिसांचा संयुक्तपणे छापा; तो मिळून आला नाही; पोलिसांनी त्यांच्या कुटूंबीयाकडे चौकशी

कोल्हापूर प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिह्यातील राजकोट (मालवण) येथील पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम व या कामाच्या सल्लागारपदाची जबाबदारी कोल्हापुरातील डॉ. चेतन एस. पाटील यांच्यावर होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याप्रकरणी डॉ. पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

या पुतळ्याचे काम जयदीप आपटे या युवा कारागीराला दिले होते. आपटे मूळचे ठाणे जिह्यातील आहेत. या कामाचा चबुतरा बांधकामांसह स्ट्रक्चरल कन्स्लटंट म्हणून डॉ. चेतन पाटील यांना काम देण्यात आले होते. डॉ. पाटील शिवाजी पेठेतील रहिवाशी असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सध्या ते एका स्वायत्त विद्यापीठातील सिव्हील इंजिनिअरींग शाखेत कार्यरत आहेत. त्यात ते स्ट्रक्चलर सल्लागार म्हणून काम पाहतात. पुतळा उभारणी व त्यासाठीचा चबुतरा बांधकामाची निविदा निघाल्यानंतर डॉ. पाटील यांनी ती भरली. त्यांना हे काम मिळाले. डॉ. पाटील यांच्यावर सल्लागार म्हणूनही जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. या संदर्भात डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पोलिस घरापर्यंत
दरम्यान, काल दुपारी जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने मालवण पोलिस डॉ. चेतन पाटील यांच्या शिवाजी पेठेतील घरी पोहोचले. वेताळ तालमीच्या परिसरात डॉ. पाटील यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉ. पाटील घरी नव्हते. दुपारनंतर त्यांच्या घराला कुलूप आहे.

Advertisement

Advertisement

.