महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रवी बिश्नोई टी-20 क्रमवारीत बनला नंबर 1!

06:07 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अफगाणच्या रशिद खानचे सिंहासन हिसकावले : अक्षर पटेल 11 व्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

टी 20 क्रिकेटला जागतिक क्रमवारीत एक नवा गोलंदाज मिळाला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आता आयसीच्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गोलंदाजीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रवि बिश्नोईने गेल्या अनेक  महिन्यांपासून प्रथम स्थानावर विराजमान असलेल्या राशिद खानला बाजूला करत ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या यादीत अफगाणचे 3 तर लंकेचे 2 खेळाडू आहे. बिश्नोई वगळता भारताचा एकाही खेळाडू टॉप 10 मध्ये नाही.

रवी बिश्नोई याआधी आयसीसी टी 20 क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीनंतर त्याने महेश तिक्षाना, आदिल रशीद, वानिंदू हसरंगा आणि राशिद खान यांना मागे टाकले आहे. बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेतील 5 सामन्यात सर्वाधिक 9 विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले होते. ताज्या क्रमवारीत तो 699 गुणासह अव्वलस्थानी असून रशिद खान 692 गुणासह दुसऱ्या तर लंकेचा वनिंद हसरंगा 679 गुणासह तिसऱ्या, इंग्लंडचा आदिल रशीद (679) चौथ्या क्रमांकावर आणि लंकेचा महिश तिक्षणा (677) पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. अक्षर पटेल 638 गुणासह 11 व्या स्थानी असून अर्शदीप सिंग 602 गुणासह 20 व्या तर भुवनेश्वर कुमार 34 व्या स्थानी आहे.

सूर्यकुमार यादवचे अव्वल स्थान अबाधित

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव टी 20 फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 855 गुण आहेत. याशिवाय, पाकचा मोहम्मद रिझवान 787 गुणासह दुसऱ्या तर आफ्रिकेचा मार्करम 756 गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 16 स्थानांची आघाडी घेत 19 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या त्याच्याकडे 581 रेटिंग पॉइंट्स आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 138 धावा केल्या होत्या. तसेच ऋतुराज गायकवाड सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 688 गुणासह ऋतुराजने ही आघाडी घेतली.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा स्टार खेळाडू शकीब अल हसन 272 गुणासह पहिल्या, अफगाणचा मोहम्मद नबी 204 गुणासह दुसऱ्या तर भारताच्या हार्दिक पंड्याने 202 गुणासह तिसरे स्थान कायम राखले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article