मृत्यू-बाधितांमध्ये देशात किंचित वाढ
07:00 AM Feb 18, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
Advertisement
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गुरुवारी किंचित वाढ झाली. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 541 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात 30 हजार 615 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच बुधवारी मृतांचा आकडा 514 इतका होता. त्यातही वाढ झाली असून गुरुवारी देशात 541 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Advertisement
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 3 लाख 32 हजार 918 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱयांच्या संख्येत वाढ होऊन 5 लाख 10 हजार 413 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Advertisement
Next Article