For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मुलांना शिकवा पैशाचे महत्व

06:00 AM Nov 10, 2021 IST | Tarun Bharat Portal
मुलांना शिकवा पैशाचे महत्व

मुलांना पैशाची ओळख अगदी लहानपणात होते. आजकाल लहान मुलांच्या ज्ञानकोषातही ‘एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकलं की पैसे निघतात’ हे ज्ञान असतं पण हे पैसे तिथे आले कुठून आणि त्यासाठी पालकांना काय करावं लागतं याची जाणीव त्यांना नसते. अनेकदा पालक मुलांना पैशाचं महत्व समजावून सांगत नाहीत. त्यांनी मागितले की पैसे द्यायचे ही पध्दत असते. पण हीच मुलं मोठी झाल्यावर मग त्यांना पैशाची किंमत कळत नाही म्हणून चिडचिड करण्यात काही हाशिल नसतं. योग्य वयात मुलांना पैशाची किंमत कळवून द्यायला हवी. आईशिवाय हे काम अधिक चांगल्या प्रकारे कोण करणार?

Advertisement

मुलांना काय कळतंय म्हणून त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवू नका. एकवेळ मोठय़ा माणसांना कळत नाही पण मुलांना समजावून सांगितलं तर त्यांना अचूक कळतं. आपल्या आर्थिक परिस्थितीची योग्य जाणीव त्यांना करून द्या.

  • गरज आणि इच्छा यातला फरक त्यांना लहानपणी शिकवला तर तो त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल. महिन्याचा खर्च कसा चालतो, आई- बाबांनी नोकरी केल्यावर त्यांना पगार मिळतो या गोष्टी त्यांना गोष्टीतून सांगा. त्यांना रोजचा खर्च लिहायला सांगा, त्यातून त्यांना पैसे खर्च होतात कसे याची जाणीव होईल.
  • मुलांबरोबर बसून खरेदीचं प्लॅनिंग करा. हे करताना मुलांच्या शाळेचे खर्च, शिकवण्या, कपडे यांचे खर्च केल्यावर किती शिल्लक राहतात हे त्यांना सांगा आणि त्यात येणार्या वस्तू निवडण्यासाठी त्यांना मदत करा.
  • मुलांना पिगी बँकेत पैसे जमा करण्याची सवय लावा. असे साठवलेले पैसे त्यांच्या इच्छेनुसार खर्च करण्याची मुभा त्यांना द्या.
  • खरेदी करताना सेल , डिस्काउंट या गोष्टी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी घेण्यासाठी थांबावं लागेल तर का याची त्यांना कल्पना द्या. त्यामुळे त्यांच्यात संयम वाढीस लागेल.
Advertisement
Advertisement
Tags :
×

.