माहिती-प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकौंट हॅक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकौंट बुधवारी हॅक झाले आहे. हॅकरने मंत्रालयाच्या ट्टिवर अकौंटला हॅक करतत्यावर एलन मस्क यांचे नाव लिहिले. हॅकरने अकौंटचे नाव बदल्यावर ‘उत्तम काम’ असे लिहिले आहे. या घटनेनंतर माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून अकौंटचा ऍक्सेस पुन्हा मिळविण्यात आल्याचे ट्विट करत सांगण्यात आले.
एलन मस्क यांच्या नावासह ब्लू टिकही लावलेले होते. परंतु एलन मस्क यांच्या नावाच्या व्यतिरिक्त अकौंटच्या तपशीलात कुठलाच बदल करण्यात आलेला नव्हता. मंत्रालयाकडून वक्तव्य प्रसारित करण्यापूर्वी लोक ट्विटर अकौंट हॅक झाल्याबद्दल कयास व्यक्त करत होते.
हॅकिंगचे हे कृत्य मस्क यांच्या चाहत्याने केली असण्याची शक्यता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. परंतु हे हॅकिंग कुणी केले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. कुठल्याही ग्रूप किंवा हॅकरने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.