कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माद्रिद ओपनमधून जोकोविचची माघार

07:15 AM Apr 30, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / माद्रिद

Advertisement

जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पुढील आठवडय़ात होणाऱया माद्रिद ओपन एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. 33 वर्षीय जोकोविच हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून गेल्या आठवडय़ात सर्बिया ओपनमध्ये तो शेवटचा खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेत उपांत्य फेरीतच त्याला रशियाच्या असलन कारात्सेव्हकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ‘या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, त्याबद्दल सॉरी. या स्पर्धेत खेळून दोन वर्षे म्हणजे बराच कालावधी झाला आहे,’ असा त्याने पाठविलेला संदेश आयोजकांनी दाखविला. मागील वर्षी ही स्पर्धा कोव्हिड 19 च्या प्रकोपामुळे रद्द करण्यात आली होती तर 2019 मध्ये जोकोविचने जेतेपद मिळविले होते. पुढील महिन्यात रोम मास्टर्स व बेलग्रेड ओपन स्पर्धा होणार आहेत, त्यात तो सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article