मातीची झोपडीचा वाढतोय ट्रेंड
अमेरिकेत माती अन् भूश्यानी तयार होतेय घर : निर्मितीकरता खर्च कमी अन् प्रदूषण शून्य
मातीची झोपडी, गवताचे छत हा तपशील ऐकून भारताच्या दुर्गम भागातील गावाचे चित्र डोळय़ासमोर येते, परंतु तुम्ही चुकीचे ठराल. हे चित्र अमेरिकेसारख्या विकसित देशाच्या मॉन्टेना किंवा ऍरिझोना सारख्या प्रांतांमध्ये तुम्हाला दिसू शकते. अमेरिकेत मागील दोन वर्षांमध्ये माती आणि भूश्याच्या मिश्रणाने घर तयार करण्याचा प्रकार वेगाने वाढला आहे. ही मोहीम 1995 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तीन विद्यार्थ्यांनी सुरू केली होती. या लोकांनी ‘डान्सिंग रॅबिट’ नावाने एक ईको-व्हिलेच तयार केले होते, जेथे लोक स्वतः माती आणि भूशाचे घर तयार करून राहतात. परंतु कोरोना काळात लोकांचे लक्ष सस्टेनेबल लिव्हिंच्या या पद्धतीकडे वेधले गेले आहे.
2020 च्या प्रारंभी सोशल मीडियावर अशाच एका घराचा व्हिडिओ समोर आल्यावर ‘डान्सिंग रॅबिट’मध्ये मातीचे घर निर्मितीचे प्रशिक्षण घेणाऱयांची संख्या अनेक पटीने वाढली. ईको-व्हिलेजमध्ये 38 घरे असून सर्व मातीने तयार केलेली आहेत.
हा विचार समोर आला तेव्हा अमेरिका आणि जगाच्या अर्थव्यवस्थेत अस्थिरता होती. 1995 मध्ये इराक-कुवैत युद्धामुळे कच्चे तेल प्रचंड महागले होते. घर खरेदी करणे अत्यंत महाग होते. त्यावेळी तीन विद्यार्थ्यांनी मिसुरी प्रांताच्या रटलेजमध्ये 280 एकर जमीन खरेदी करत ईको व्हिलेजची सुरुवात केल्याचे डान्सिंग रॅबिट ईको व्हिलेजच्या कार्यकारी संचालिका डेनिल विलियम यांनी सांगितले.
अमेरिकेचे मूळ रहिवासी रेड इंडियन्स देखील शतकांपासून मातींच्या घरांमध्ये राहत आले होते. अधिक संशोधन केले असता भारतात अशी घरे प्राचीन संस्कृतामध्येही आढळून आल्याचे समजले. याचमुळे आम्ही घरनिर्मितीसाठी ही पद्धत अनुसरल्याचे त्यांनी सांगितले.
कशाप्रकारे होते उभारणी?
या घरांमध्ये सिमेंट किंवा लोखंडाचा वापर होत नाही. ज्या जमिनीवर घर उभारायचे आहे, तेथे खोदकाम करून माती मिळविली जाते आणि बाजारातून भूसा अत्यंत स्वस्त दरात मिळतो. 70 टक्के वाळू, 30 टक्के मातीत भूसा मिसळून भिंती तयार केल्या जातात. बांबू किंवा अन्य उपलब्ध लाकडापासून छताची रचना तयार केली जाते. त्यावर गवताचे छत तयार केले जाऊ शकते. भिंतींसाठी तयार मिश्रणापासूनच कौलं तयार करून त्याद्वारेही छत निर्माण करता येते.
सौरघटाद्वारे वीज मातीच्या घराच्या छतावर सौरघट बसून गरजेची वीज निर्माण करता येते. पावसाचे पाणीही जतन करता येते. अमेरिकेत सध्या 12 चौरस फुटांपेक्षा अधिक मोठे घर तयार करण्यासाठी मंजुरी अनिवार्य आहे. याचमुळे ईको-व्हिलेजमध्ये अनेक लोकांनी एक मोठे घर निर्माण करण्याऐवजी 12-12 चौरस फुटांचे 3 -4 युनिट तयार केले आहेत.