महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महापूर-भूस्खलनात ब्राझीलमध्ये 104 ठार

07:00 AM Feb 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्राझिलिया / वृत्तसंस्था

Advertisement

ब्राझीलच्या रिओ डी जनेरियो शहरातील पेट्रोपोलिस परिसरात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये पन्नासहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. महापुरामुळे भूस्खलनाची दुर्घटना घडली असून मदत व बचावकार्य अद्यापही सुरू आहे. गुरुवारपर्यंत 21 लोकांना वाचवण्यात यश आले असून अजूनही 26 जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिकांच्या हवाल्याने देण्यात आली. ब्राझीलमध्ये मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून दोन दिवसात काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱयाच भागात भूस्खलनाच्या छोटय़ा-मोठय़ा दुर्घटना घडल्याची नोंद झाली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी आपद्ग्रस्तांना अत्यावश्यक मदत पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article