मराठा मंदिरतर्फे पंतप्रधान निधीला लाखाचा निधी
06:06 AM Apr 24, 2020 IST
|
Tarun Bharat Portal
पंतप्रधान निधीसाठी मदत वितरणप्रसंगी उपस्थितांत नेमिनाथ कंग्राळकर, नेताजी जाधव, आमदार अनिल बेनके, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, शिवाजीराव हंगिरगेकर, लक्ष्मणराव सैनुचे, आप्पासाहेब गुरव, बाळासाहेब काकतकर आदी.
Advertisement
प्रतिनिधी / बेळगाव :
Advertisement
येथील मराठा मंदिर ट्रस्टच्यावतीने कोरोना लढाईसाठी मदत म्हणून
पंतप्रधान निधीला 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. गरजूंना आवश्यक धान्य सामग्रीचे
वितरण करण्यात आले. मराठा मंदिर येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.
Advertisement
यावेळी
पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, मराठा मंदिरचे
अध्यक्ष शिवाजी हंगिरगेकर, चंद्रकांत गुंडकल, अप्पासाहेब गुरव, नेताजी जाधव, बाळासाहेब
काकतकर, नेमिनाथ कंग्राळकर, लक्ष्मणराव सैनुचे, दिनकर घोरपडे आदी उपस्थित होते. मराठा
मंदिरने कोरोनाच्या लढाईत दिलेल्या या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रशंसोद्गार
काढले.
Advertisement
Next Article