महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंडेलांशी संबंधित स्थळे जागतिक वारसा यादीत

06:22 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘युनेस्को’कडून गौरव, दक्षिण आफ्रिकेत जल्लोष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दक्षिण आफ्रिकेच्या महापुरुषांपैकी एक आणि मुक्तिसंग्रामाचे प्रणेते नेल्सन मंडेला यांच्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक स्थळांचा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतात झालेल्या 46व्या अधिवेशनात जागतिक वारसा समितीने याची घोषणा करताच दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी जल्लोष सुरू केला.

आफ्रिकन देशाने मंडेलांशी संबंधित स्थळांबाबत नामांकन सादर केल्यानंतर इटली, दक्षिण कोरिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, जपानसह अनेक देशांनी नामांकनाला पाठिंबा दिला. यावर भाष्य करताना या स्थळांना सर्व मानवजातीसाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे जपानच्या प्रतिनिधीने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेने मानले भारताचे आभार

देशाच्या वतीने निवेदन देताना दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळातील सदस्याने आनंद व्यक्त केला. जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. भारत जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे आयोजन करत आहे. यापूर्वी, भारताच्या आसाम राज्यातील चराईदेव मोईदम या प्राचीन वास्तूलाही जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article