For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाओस देशाने जारी केले रामलल्लाचे टपाल तिकीट

06:45 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
लाओस देशाने जारी केले रामलल्लाचे टपाल तिकीट
Advertisement

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हियनतियाने

दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशाने अयोध्येतील श्री रामलल्ला यांच्यावर टपाल तिकीट जारी केले आहे. लाओसने केवळ रामलल्लाचीच नव्हे तर महात्मा बुद्धांचीही टपाल तिकिटे जारी केली आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘एक्स’वर ही माहिती दिली आहे. आता लाओ पीडीआर (लाओ पीपल्स डेमोव्रेटिक रिपब्लिक) हा अयोध्या स्टॅम्प जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

Advertisement

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या लाओसच्या दौऱ्यावर आहेत. रामायण आणि बौद्ध धर्माच्या आमच्या सामायिक सांस्कृतिक खजिन्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एक विशेष तिकीट संच सुरू करण्यात आला आहे. जयशंकर आसियान-भारत मंत्रिस्तरीय परिषद, पूर्व आशिया शिखर परिषदेच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आणि आसियान प्रादेशिक मंच बैठकीसाठी व्हियनतियानेच्या दौऱ्यावर आहेत. बौद्ध धर्मामुळे भारत आणि लाओसमध्ये शतकानुशतके चांगले संबंध आहेत.

प्रभू रामाचे बालस्वरूप दाखवणारी श्री रामलल्लाची मूर्ती हे अयोध्येतील राम मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. काळ्या पाषाणापासून बनवलेली ही मूर्ती 51 इंच उंच असून 22 जानेवारी 2024 रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.