भूतानमध्ये आढळले नव्याने रुग्ण, चिंता वाढली सरकारची
07:50 AM Jan 16, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
तिम्पू
Advertisement
भूतान देशामध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून पहिल्यांदाच 14 रुग्ण आढळले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात अधिक तपासणी केली जात असल्याचे सांगितले जाते. हिमालयीन पर्वतरांगांच्या बाबतीमध्ये अग्रेसर असणाऱया भूतानने कोरोनावर उत्तमपणे नियंत्रण मिळवले असल्याचे दिसले आहे. रॉयल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे मुख्य सोनम वांगचुक यांनी सर्व रुग्णांचे सॅम्पल एकत्रित करण्यात आले असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. परदेशातून येणाऱया प्रवाशांची ज्या ठिकाणी सोय असते त्या ठिकाणी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदरचे आढळलेले रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत की नाहीत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. देशाने आत्तापर्यंत 7 लाख 50 हजार लोकांचे लसीकरण म्हणजे 93 टक्के लोकांचे लसीकरण केले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article