कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय नौदलाची पुन्हा हुथी बंडखोरांवर मात

06:46 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजावरील हल्ला फसला, क्रू मेंबर्सची यशस्वी सुटका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी  दिल्ली

Advertisement

रशियातून भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नौदलाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत भारतीय क्रू मेंबर्ससह (कर्मचारी) इतरांचे प्राण वाचवले. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस कोचीने शुक्रवारपासून लाल समुद्रात पनामा-ध्वजांकित क्रूड ऑईल टँकर एमव्ही एंड्रोमेडा स्टारच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. भारतीय नौदलाने कच्च्या तेलाच्या टँकर एमव्ही एंड्रोमेडा स्टारचे स्थान शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करून हवाई बचाव मोहीम राबवली. यानंतर शिपबोर्न ईओडी टीम तैनात करण्यात आली होती.

येमेनचे हुथी बंडखोर गेल्या अनेक महिन्यांपासून लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी भारतात येणाऱ्या जहाजावर लाल समुद्रात क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने वेळीच पावले उचलत हल्ला परतवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. हल्ला झालेल्या एमव्ही एंड्रोमेडा स्टार जहाजावर 22 भारतीयांसह 30 क्रू मेंबर उपस्थित होते. हे सर्वजण सुरक्षित असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. तसेच सदर जहाज पुढील बंदराच्या दिशेने जात असल्याची माहितीही देण्यात आली. आतापर्यंतच्या तपासणीनुसार एमव्ही एंड्रोमेडा स्टारशिपचे किरकोळ नुकसान झाले आहे. या जहाजावर तेलाचे टँकर असून ते रशियातील प्रिमोर्स्क येथून भारतातील वाडीनारकडे येत आहे.

इस्रायल-हमास युद्धापासून इराण समर्थित हुथी बंडखोर नोव्हेंबरपासून लाल समुद्र आणि आसपासच्या भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमुळे शिपिंग मार्गांवर परिणाम होत आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे मध्य-पूर्वेमध्ये चिंता निर्माण झाली आहे. एमव्ही एंड्रोमेडा स्टारवरील हल्ल्याची कबुली येमेनच्या हुथी बंडखोरांनीच दिली होती. गाझा युद्धाच्या दरम्यान पॅलेस्टिनींना चालू असलेल्या समर्थनाचा भाग म्हणून टँकरला लक्ष्य केल्याचे त्यांनी म्हटले होते. या हल्ल्याची पुष्टी युएस सेंट्रल कमांडनेही केली होती.

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हुथी बंडखोर हल्ले असून यापूर्वी त्यांचे लक्ष्य फक्त इस्रायलची जहाजे होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून इतर देशांच्या जहाजांनाही लक्ष्य केले जात आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक शिपिंग कंपन्या आपली जहाजे दक्षिण आफ्रिकेत लांबच्या मार्गाने पाठवत आहेत. परिणामत: माल वाहतुकीचा खर्च वाढला असून जागतिक स्तरावर महागाईही वाढली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article