भारताचे ‘युपीआय’ नेपाळमध्येही सुरू
शेजारी देशाची डिजिटल अर्थव्यवस्थाही होणार मजबूत
वृत्तसंस्था / काठमांडू
इंडियन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने (एनपीसीआय) नेपाळ भारताची युपीआय प्रणाली अवलंबिणारा पहिला देश ठरल्याचे असल्याचे म्हटले आहे. युपीआयमध्ये शेजारी देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यास उल्लेखनीय मदत मिणार आहे. एनपीसीआयची आंतरराष्ट्रीय शाखा एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (एनआयपीएल) नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी गेटवे पेमेंट्स सर्व्हिस (जीपीएस) आणि मनम इन्फोटेकसोबत हातमिळवणी केली आहे.
जीपीएस नेपाळमध्ये अधिकृत पेमेंट प्रणालीचा नियामक आहे. मनम इन्फोटेक नेपाळमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय)ला लागू करणार आहे. या भागीदारीने नेपाळमध्ये लोकांसाठी सुविधा वाढणार आणि डिजिटल देवाणघेवाणीला चालना मिळणार असल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे.
आर्थिक व्यवहारांच्या डिजिटलायजेशनला चालान देणारे पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून युपीआयचा स्वीकार करणारा नेपाळ हा भारताव्यतिरिक्त पहिला देश ठरला आहे. युपीआय सेवेने भारतात डिजिटल पेमेंटप्रकरणी अत्याधिक सकारात्मक प्रभाव पाडल्याचे जीपीएसचे सीईओ राजेश प्रसाद मनंधर यांनी म्हटले आहे. युपीआय नेपाळमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेला बदलणे आणि कमी रोकड बाळगणाऱया समाजाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे ते म्हणाले. युपीआयने 2021 मध्ये 940 अब्ज डॉलर्सचे 3900 कोटी आर्थिक व्यवहार हाताळले असून भारताच्या जीडीपीच्या तुलनेत हे 31 टक्क्यांइतके आहे.