महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप प्रदेश निवडणूक प्रभारीपदी आशिष सूद नियुक्त

06:34 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसचे छाननी समिती अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री गोव्यात दाखल

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष सक्रिय होऊ लागले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी विविध राज्यांसाठी प्रदेश निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे छाननी समिती अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री गोव्यात दाखल झाले आहेत.

श्री. नड्डा यांनी एकूण 23 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रमुख आणि सह प्रमुख नियुक्त केले आहेत. त्यात गोव्यासह अंदमान निकोबार, अऊणाचल प्रदेश, चंडीगढ, दमण-दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, ओडीशा, पुडुचेरी, पंजाब, सिक्कीम, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

गोव्यासाठी आशिष सूद यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडेच जम्मू काश्मीर राज्याचाही अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये पाच आहेत. यापूर्वी अभाविपशी संबंधित असलेले सूद भाजपचे एक मजबूत, विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर स्पष्ट वक्ते, सडेतोड व्यक्तिमत्त्व अशीही त्यांची ओळख आहे. ते जनकपुरी भागातील आहेत. 1980 च्या दशकात गाजलेल्या बोफोर्स घोटाळ्यासह अन्य अनेक भ्रष्टाचारविरोधी चळवळींचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

मधुसूदन मिस्त्री गोव्यात दाखल

दरम्यान, गोवा काँग्रेसचे छाननी समिती अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री शनिवारी गोव्यात दाखल झाले आहेत. आपल्या या भेटीत ते प्रत्येक इच्छुकाशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करणार असून त्यानंतरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीत अन्य सदस्यांमध्ये सुरज हेगडे, शफी पारांबिल, आणि माणिकराव ठाकरे यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article