For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भांड्याच्या दुकानाचे शटर उचकटून 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल लंपास

12:11 PM Mar 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
भांड्याच्या दुकानाचे शटर उचकटून 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल लंपास
Advertisement

मटण मार्केट परिसरातील घटना, 2 लाख 10 हजारांच्या रोकडसह तांबे,पितळीच्या मोडीवर डल्ला

कोल्हापूर प्रतिनिधी

मटण मार्केट परिसरातील भांड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने 2 लाख 10 हजारांची रोकड, तांबे, पितळीची मोड असा सुमारे 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद दुकानाचे मालक अमित अशोक आहुजा (वय 35 रा.लक्ष्मीपुरी) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीपुरी मटण मार्केट परिरसात अमित आहूजा यांचे भांडयाचे दुकान आहे. बुधवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटर उचकटल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, कॅश काऊंटर मधील रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. दुकानात इतरत्र पाहणी केली असता, तांबे व पितळेची मोड लंपास क्केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरटयांचा शोध घेत आहेत.

Advertisement
Advertisement

.