For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

ब्रोकेडची शान

06:00 AM Oct 30, 2021 IST | Tarun Bharat Portal
ब्रोकेडची शान

आपल्याकडची ब्रोकेड संस्कृती थेट सिंधू संस्कृतीच्या काळातली आहे. मोहेंजोदडो आणि हडाप्पाच्या उत्खननामध्ये ब्रोकेड सापडलेले नमुने म्युझियममधून बघायला मिळतात. त्यावेळी तर माशाच्या काटय़ापासून तयार केलेल्या सुईमध्ये सोन्याची वा चांदीची जर ओवून ती रेशमावर भरली जात असे.

Advertisement

  • आपल्याकडच्या ब्रोकेडमध्ये जी डिझाइन असतात ती जगात कुठेच दिसणार नाहीत.
  • भारतीय संस्कृतीमध्ये साडीला फार महत्व आहे. साडीमध्ये स्त्रीचे सेंदर्य अधिकच खुलते. सध्या या साडय़ांचे खूपच प्रकार आणि ब्लाऊजचेही प्रकार पहायला मिळतात.
  • ब्रोकेड म्हणजे वोव्हन सिल्क. म्हणजेच सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने डिझाईन विणलेलं रेशीम.
  • रेशीम वजनाला खूपच हलकं असतं. तसंच प्लेन रेशमाचे कपडे तितकेसे उठूनही दिसत नाहीत. म्हणून रेशीम डिझाईनमध्ये विणण्याला जास्त पसंती दिली जाऊ लागली.
  • भारतासह पर्शिया, चीन, जपान, तुर्कस्तान, इटली या सगळय़ा संस्कृतीत ब्रोकेड प्रसिध्द आहे. आता तर अंगावर वजनदार वाटणार्या आणि खिशाचं वजन कमी करणार्या बनारसी ब्रोकेडचा उपयोग साडीव्यतिरिक्त इतर प्रकारेही होऊ लागला आहे.
  • ब्रोकडमधली मराठी पध्दतीच्या नऊवारी लुकची सलवार आणि त्यावर पोटिमा ब्लाऊज या प्रकारच्या पेहरावाला लग्नाच्या सीझनमध्ये मुली जास्त मान्यता देतात.
  • ब्रोकेडमधल्या पर्शियन कार्पेट आजदेखील जगाला भुरळ घालतात. पर्शियन कार्पेटवर मोठय़ा पानाफुलांची डिझाईनच अधिक दिसतात. तशीच डिझाईन त्यांच्या इतर वापरल्या जाणार्या पेहरावांवरही दिसतात. तर तुर्कस्तानमध्ये ब्रोकेडचा कार्पेट, वॉल हँगिंग, वॉल कार्पेटसाठी उपयोग केला जात असे.
  • तिथे दरबारी मंडळींचे पेहराव प्रखर रंगातील चमकदार वेलवेट सिल्कवर सोन्या वा चांदीच्या जरीने मढविलेल्या ब्रोकेडमधले असत. छोटी छोटी पाने, फुले आणि भौमितिक रचना त्यांच्याकडे जास्त दिसत.
Advertisement
Tags :
×

.