For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोनमती, जोकोविच यांना लॉरियस पुरस्कार,

06:36 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोनमती  जोकोविच यांना लॉरियस पुरस्कार
Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रिद, स्पेन

Advertisement

या वर्षीच्या लॉरेयस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कारांत स्पेन महिलांनी वर्चस्व राखले तर सर्बियाचा टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचला वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार मिळाला.

गेल्या वर्षी स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने प्रथम वर्ल्ड कप जिंकला होता. या संघाला आणखी दोन पुरस्कार मिळाले आहेत. या संघाला वर्षातील सर्वोत्तम संघ तर मिडफिल्डर ऐताना बोनमतीला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रीडापटूच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. येथे आयोजित झगमगत्या कार्यक्रमात नोव्हॅक जोकोविच व बोनमती यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमेरिकेची महिला जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सला सर्वोत्तम पुनरागमनाचा पुरस्कार प्राप्त झाला. रियल माद्रिदचा फॉरवर्ड जुड बेलिंगहॅमला सर्वोत्तम ब्रेकथ्रूचा बहुमान मिळाला. स्पेनच्या राफले नदालने स्पोर्ट फॉर गुड हा पुरस्कार मिळविला. त्याच्या फौंडेशनमुळे त्याला हा बहुमान मिळाला.

Advertisement

गेल्या वर्षी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत स्पेनच्या महिलांनी जेतेपद पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली. पण सामन्यानंतर एक घटनेने थोडा वादही निर्माण झाला होता. अंतिम लढत झाल्यानंतर त्यावेळच्या फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबायल्स यांनी स्पेन संघातील आघाडीवीर जेनी हर्मोसो हिचे अनपेक्षितणे चुंबन घेतल्याने थोडे गालबोट लागले होते. सर्वोत्तम संघाचा पुरस्कार देऊन लॉरियसने या महिलांचा सन्मानच केला आहे. महिला संघाने हा पुरस्कार पटकावण्याची पहिलीच वेळ आहे.

विश्वचषक स्पर्धेआधी बोनमतीने महिलांची चॅम्पियन्स लीग स्पर्धा बार्सिलोनाला मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. लॉरियस पुरस्कार मिळविणारी ती पहिली महिला फुटबॉलपटू आहे. बॅलन डीओर व फिफाचा सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कारही तिने मिळविला आहे. आपल्याला सहकार्य केलेल्या सहकाऱ्यांचा, क्लबचा, राष्ट्रीय संघातील खेळाडूंचा, स्टाफ व प्रशिक्षकांचे तिने आभार मानले.

जोकोविचने मात्र पाचव्यांदा लॉरियस पुरस्कार पटकावत रॉजर फेडरर विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन व यूएस ओपन स्पर्धा जिंकून त्याने एकूण 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. एनएफएल खेळाडू टॉम ब्रॅडीने त्याला पुरस्कार प्रदान केला. अमेरिकेच्या सिमोन बाइल्सने मागील वर्षी विक्रमी पुनरागमन करताना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिला विक्रमी सहाव्यांदा ऑलराऊंड टायटलही मिळाले. राफेल नदालच्या फौंडेशनला भारत व स्पेनमधील 1000 गरीब-गरजवंतांना मदत केल्याबद्दल त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :

.