For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेम्स अँडरसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा! लॉर्ड्सवर खेळणार अंतिम सामना

08:19 PM May 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
जेम्स अँडरसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा  लॉर्ड्सवर खेळणार अंतिम सामना
James Anderson
Advertisement

इंग्लंडचा सर्वात अनुभवी आणि वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आज शनिवारी आपली निवृत्ती जाहीर केली. 10 जुलै वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर तो निवृत्त होईल. आपल्या निवृत्तीची घोषणा त्यांने आपल्या एक्स या सोशलमीडीया प्लॅटफॉर्मवर जाहीर केली.

Advertisement

जेम्स अँडरसन याने 2003 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले होते. आपल्या फिटनेस साठी नेहमीच नावाजलेल्या अँडरसनने 187 कसोटींमध्ये 700 विकेट्स घेतल्या. वयाच्या 41व्या वर्षीही जेम्स अँडरसनचा फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो. कसोटी इतिहासात आजपर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाने इतक्या बळींचा टप्पा गाठला नाही.

आपल्या संदेशामध्ये जेम्स अँडरसन म्हणाला, "सर्वांना नमस्कार. लॉर्ड्सवरील उन्हाळ्यामध्ये होणारी पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असणार आहे." असे म्हटले आहे. पुढे लिहिताना अँडरसनने "माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना, आणि माझ्या लहानपणापासूनच्या आवडीचा खेळ असलेला क्रिकेट यासाठीची 20 वर्षे अतुलनीय आहे. पण आता मला यातून बाहेर पडण्याची आणि इतरांना संधी देण्याची हीच संधी योग्य असल्याची जाणीव आहे."असे त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

आपल्या कुटुंबाविषयी लिहीताना जेम्स म्हणला, "डॅनिएला, लोला, रुबी आणि माझ्या आई वडिलांच्या प्रेमाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. त्यांचे खूप खूप आभार. तसेच, जगातील सर्वोत्तम काम करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभार." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.