महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेनी ब्लँकोसोबत रिलेशनशिपमध्ये सेलेना

06:07 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेलेना गोमेझच्या नव्या बॉयफ्रेंडची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सेलेनाने आपण कुणाला डेट करतोय हे जाहीर केले आहे. गायिकेने 35 वर्षीय रिकॉर्ड मेकर बेनी ब्लँको सोबतच्या नव्या नात्याची घोषणा करत सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. सेलेनाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्वत:च्या नव्या रिलेशनशिपचे संकेत दिले होते. यानंतर तिने ब्लँकोसोबतची एक मोनोक्रोम सेल्फी शेअर केली होती. अमेरिकन रिकॉर्डमेकर बेंजामिन जोसेफ लेविनला बेनी ब्लँको या नावाने देखील ओळखले जाते. मूळचा व्हर्जिनियाचा असलेला ब्लँको हा ज्यूधर्मीय आहे. तो स्वत: गाणी लिहितो आणि ती रिकॉर्ड देखील करतो. 1994 मध्ये त्याने वयाच्या सहाव्या वर्षी ‘नॅस के द वर्ल्ड इज योर्स’ आणि ‘ऑल-4-वन’ गाणे रिकॉर्ड केले होते. 2000 च्या दशकाच्या प्रारंभी त्याने अनेक हिट गाणी लिहिली होती. एड शीरन, जस्टिन बीबर, हॅल्सी, कॅटी पेरी, मरून 5, केशा, ब्रिटनी स्पीयर्स, रिहाना, सिया, द वीकेंड, कान्ये वेस्ट, एविसी आणि सेलेना गोमेझ यासारख्या कलाकारांसाठी त्याने अनेक गाणी लिहिली आहेत.

Advertisement

ब्लँकोचा पहिला अल्बम ‘फ्रेंड्स कीप सीक्रेट्स’ डिसेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. अल्बमसाठी त्याने अनेक संगीतकारांसोबत काम केले असून यात गोमेझचा एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबर, ग्रेसी अब्राम्स, उमर अपोलो आणि हॅल्सी तसेच केल्विन हॅरिस सामील आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article