बकरीने दिला मानवी चेहऱयाच्या पिलाला जन्म
मातेच्या गर्भात काही वेळा भ्रृणाच्या जनुकीय संरचनेत काही दोष निर्माण झाल्याने जन्माला येणाऱया अर्भकाचा चेहरामोहरा बदलतो, असे मानवाच्या बाबतीतच घडते असे नाही. प्राण्यांच्या बाबतीत असे घडू शकते. अशाच प्रकारे मध्यप्रदेशातील एका खेडय़ात एका बकरीने मानवासारख्या चेहऱयाचे एक पिलू जन्माला घातले आहे. हा चमत्कार बघण्यासाठी या खेडय़ात बघ्यांची रीघ लागली आहे. हे खेडे विदिशा जिल्हय़ातील सेमलखेडी या नावाचे आहे.
या पिलांचे डोळे थेट माणसासारखे एकमेकांच्या जवळ आणि नाकाच्या दोन्ही बाजूला आहेत. डोळय़ांभोवती माणसाप्रमाणेच काळी वर्तुळे आहेत. पिलाचा चेहराही पुष्कळसा माणसासारखाच दिसतो. तसेच नवजात अर्भकाला जावळ असते तसे या पिलाच्या डोक्मयावरही दाट केस आहेत. विज्ञानाच्या म्हणण्यानुसार हा जनुकीय दोष आहे. मात्र, लोकांची भावना अशी आहे, की हा परमेश्वरी चमत्कार आहे. या पिलाचा चेहरामोहरा नेहमीसारखा नसल्याने ते त्याची आई असणाऱया बकरीचे दूध स्वतः होऊन पिऊ शकत नाही. त्याला सिरिंजने दूध पाजवावे लागत आहे. पशुचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार अशा स्थितीत जन्मलेल्या पिलाला ‘हेड डायस्पेपसिया’ नावाचा विकार झालेला असतो. 50 हजार बकऱयांमध्ये एका बकरीच्या पोटी असे पिलू जन्माला येऊ शकते. हा प्रकार गाय आणि म्हशींच्या बाबतीत अधिक प्रमाणात होतो. पण बकरीमध्ये असे घडले दुर्मीळ असते.