महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बंगाल, केरळ उपांत्यपूर्व फेरीत

06:22 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

2023 च्या क्रिकेट हंगामातील विजय हजारे करंडक वनडे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत बंगाल आणि केरळ या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. शनिवारी झालेल्या सामन्यात बंगालने गुजरातचा 8 गड्यांनी पराभव केला. तर केरळने महाराष्ट्रचा 153 धावांनी पराभव करत शेवटच्या आठ संघात स्थान मिळविले.

Advertisement

गुजरात आणि बंगाल यांच्यात सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 283 धावा जमविल्या. त्यानंतर बंगालने 46 षटकात 2 बाद 286 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला.

गुजरातच्या डावामध्ये प्रियांक पांचाळने शानदार शतक झळकाविताना 114 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 101 तर सौरभ चौहानने 53 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 53 तसेच उमंगकुमारने 47 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 65 धावा जमाविल्या. बंगालतर्फे सुमनदास आणि प्रदीपता यांनी प्रत्येकी 2 तर करणलाल, मोहम्मद कैफ आणि पोरल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्त्युतरादाखल खेळताना बंगालच्या डावात सुदीपकुमार घरमी आणि मुजूमदार यांनी नाबाद शतके झळकवली. घरमीने 132 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 117 तर मुजुमदारने 88 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 102 तसेच अभिषेक पोरलने 53 चेंडूत 5 चौकारांसह 47 धावा जमविल्या. गुजराततर्फे चिंतन गजा आणि पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : गुजरात 50 षटकात 9 बाद 283 (पांचाळ 101, चौहान 53, उमंगकुमार 65, सुमनदास, प्रदीपता प्रत्येकी 2 बळी), बंगाल 46 षटकात 2 बाद 286 (सुदीपकुमार घरमी नाबाद 117, मुजुमदार नाबाद 102, पोरल 47).

केरळ विजयी

केरळ आणि महाराष्ट्र यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केरळने 50 षटकात 4 बाद 383 धावा जमाविल्या. त्यानंतर महाराष्ट्रचा डाव 37.4 षटकात 230 धावात आटोपला. केरळच्या डावामध्ये कृष्णाप्रसाद आणि के. रोहन यांनी दमदार शतके झळकाविली. कृष्णाप्रसादने 137 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह 144 तर रोहनने 95 चेंडूत 1 षटकार आणि 18 चौकारांसह 120, कर्णधार संजू सॅमसनने 4 चौकारांसह 29, विष्णू विनोदने 4 षटकार आणि 1 चौकारसह 43, अब्दुल बसितने 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 35 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दढे, मनोज इंगळे, रामकृष्ण घोष, काझी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना महाराष्ट्रच्या डावात सलामीच्या ओम भोसलेने 71 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 78 तर कौशल तांबेने 5 चौकारांसह 50, निखिल नाईकने 21, घोषने 20 धावा जमविल्या. केरळतर्फे श्रेयस गोपालने 35 धावात 4 तर विशाख चंद्रनने 39 धावात 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : केरळ 50 षटकात 4 बाद 383 (कृष्णाप्रसाद 144, के. रोहन 120, विष्णू विनोद 43, संजू सॅमसंन 29, बसिथ नाबाद 35), महाराष्ट्र 37.4 षटकात सर्व बाद 230 (ओम भोसले 78, तांबे 50, नाईक 21, श्रेयस गोपाल 4-35, विशाख चंद्रन 3-39).

 

Advertisement
Next Article