महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फंगसच्या नव्या स्ट्रेनमुळे वाढली चिंता

07:38 AM Nov 24, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशात पहिल्यांदाच औषधांना निष्प्रभ करणाऱया फंगसचे निदान

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील एम्समध्ये फंगसच्या एका नव्या स्ट्रेनचा शोध लागला आहे. एस्परगिलस लेंटुलस नावाच्या या फंगसने एम्सच्या डॉक्टरांनाही हैराण केले आहे, कारण देशात पहिल्यांदाच या फंगसला डिटेक्ट करण्यात आले आहे. हा फंगस औषधांना पूर्णपणे निष्प्रभ करतो. दिल्ली एम्समध्ये या फंगसच्या संसर्गाला तोंड देणाऱया 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या दोन्ही रुग्णांना क्रोनिक ऑब्सट्रक्टिव्ह प्लमोनरी डिसिजच्या (सीओपीडी) त्रासानंतर दाखल करण्यात आले होते. हा फुफ्फुसांशी संबंधित आजार असून यात शरीरात जाणाऱया हवेचा प्रवाह कमी होतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. हा आजार होऊ लागल्यावर मृत्यू होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणात वाढते.

जगात एस्परगिलस लेंटुलसचा पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर अनेक देशांच्या डॉक्टरांनी याचे रुग्ण सापडल्याची पुष्टी दिली आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी (आयजेएमएम) मध्ये प्रकाशित  अहवालानुसार एम्समध्ये मृत्युमुखी पडलेल्या एका रुग्णाचे वय 50 वर्षे तर दुसऱयाचे वय 40 वर्षे होते.

महिनाभर उपचारानंतर मृत्यू

खासगी रुग्णालयाने रुग्णामधील संक्रमण कमी न झाल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्याची सूचना केली होती. एम्समध्ये या रुग्णांना एम्फोटेरिसिन बी आणि ओरल वोरिकोनाजोल नावाचे अँटी फंगल औषध देण्यात आले होते. एक महिन्यापर्यंत चाललेल्या उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नव्हती.

अनेक अवयव निकामी

दुसऱया रुग्णाला तीव्र ताप, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये भरती करण्यात आले होते. पहिल्या रुग्णाप्रमाणेच दुसऱयावर एम्फोटेरिसिन बी अँटी फंगल औषधाने उपचार करण्यात आले. एक आठवडय़ापर्यंत चाललेल्या उपचारानंतर रुग्णाचे अनेक अवयव निकामी होत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एम्सच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आणि पल्मोनोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी आयजेएमएम नियतकालिकात स्वतःचे संशोधन प्रकाशित केले.

कोरोनाबाधितांना फंगसचा धोका

कोरोना संक्रमणातून बरे होणारे अनेक रुग्ण फंगल इन्फेक्शनचे शिकार होतात. सहव्याधी असणारे किंवा शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी करणारी औषधे घेणाऱया लोकांना फंगसचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. हा संसर्ग शरीराच्या कुठल्याही हिस्स्यात होऊ शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article