महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेड्रो कॅपो बेंगळूर एफसीशी करारबद्ध

06:21 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगरूर

Advertisement

बेंगळूर एफसीने स्पॅनिश मिडफिल्डर पेड्रो कॅपो याला एका वर्षासाठी करारबद्ध केल्याचे मंगळवारी जाहीर केले.

Advertisement

33 वर्षीय पेड्रो हा नियमितपण डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून काम पाहतो. तो सेंटरबॅक म्हणूनही खेळू शकतो. ‘बेंगळूर एफसी हा भारतातील एक सर्वोत्तम संघ असून या संघाशी करारबद्ध झाल्याचा आनंद वाटतो. भारतात खेळण्यासाठी यापूर्वीच मला संधी मिळाल्या होत्या. पण ती योग्य वेळ नसल्याचे वाटल्याने त्या स्विकारल्या नव्हत्या. गेरार्ड झारागोझाने येथील माहिती दिल्यानंतर माझ्यात येथे येऊन परफॉर्म करण्याचा उत्साह निर्माण झाला आणि ही योग्य वेळ असल्याने मी भारतात येण्याचा निर्णय घेतला. मला येथे उत्तम अनुभव मिळेल, अशी मला आशा वाटते,’ असे पेड्रो म्हणाला. ड्युरँड चषक स्पर्धेआधी तो बेंगळूर एफसी संघात दाखल होणार आहे.

Advertisement
Next Article