पिकलबॉल स्पर्धेत भारताला सहा पदके
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हाँगकाँगमध्ये झालेल्या विश्व पिकलबाल चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी करत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कास्य अशी एकूण 6 पदके मिळविली.
भारताच्या वनशीक कापाडीया आणि वृशाली ठाकरे यांनी खुल्या मिश्र दुहेरीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सदर स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान हाँगकाँगमध्ये घेण्यात आली होती. खुल्या मिश्र दुहेरीत भारताच्या कुलदीप महाजनने दक्षिण कोरियाच्या गेवॉन समवेत रौप्य पदक मिळविले. तसेच वनशीक कापाडीयाने पुरुष एकेरीत, करिना द्विपेयानी आणि वृशाली ठाकरे यांनी खुल्या महिलांच्या दुहेरीत रौप्य पदके मिळविली. भारताच्या इशा लाखानी आणि रुस रीक यांनी महिलांच्या दुहेरीत 2 कास्य पदके घेतली आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये विश्व पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या भारतातील झालेल्या टप्प्यात यजमान भारताने 11 सुवर्ण पदकांसह 28 पदकांची लयलूट केली होती.