पावसाच्या रिपरिपीतही शिवभक्तांचा उत्साह टिकून
सायंकाळी 7 वाजता पालखी पूजन : मिरवणुकीत पावसाचा व्यत्यय
► प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाची रिपरिप सुरू असतानाही बेळगावमधील शिवभक्तांचा उत्साह मात्र कुठेही कमी नव्हता. शनिवारी सायंकाळी 7 वाजता नरगुंदकर भावे चौकातून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांच्या हस्ते शिवप्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक मार्गावर पालखीला सुरुवात झाली.
बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भव्यदिव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. शनिवारी सकाळपासूनच चित्ररथ मिरवणुकीतील रथ मारुती गल्ली येथे आणण्यात आले होते. पावसामुळे मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्याला विलंब होत गेला.
सायंकाळी 7 च्या सुमारास पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पालखीचे पूजन करून चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. वडगाव येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या वारकऱ्यांनी भजने सादर केली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही पालखी मिरवणुकीमध्ये शिवभक्तांचा सहभाग होता. मिरवणूक शांततेत पार पडावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी शिवभक्तांना दिल्या.
यावेळी प्रकाश मरगाळे, मदन बामणे, गणेश द•ाrकर, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, नरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, अमर येळ्ळूरकर, प्रकाश शिरोळकर, एम. वाय. घाडी, संजय मोरे, धनंजय पाटील, सरिता पाटील, माया कडोलकर, महादेव चौगुले, महादेव पाटील, अजित कोकणे यांसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
पावसामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ
शनिवारी झालेल्या पावसामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. मारुती गल्ली येथे लावण्यात आलेले गाडे झाकून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. तसेच साऊंड सिस्टिम, प्रकाश योजना व इतर साहित्य खराब होऊ नये यासाठी झाकून ठेवावे लागले.
बेळगाव शहरात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शिवभक्तांच्या अपूर्व उत्साहात पार पडली. शनिवारी सायंकाळी 7 वाजता नरगुंदकर भावे चौकातून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांच्या हस्ते शिवप्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक मार्गावर पालखीला सुरुवात झाली. शिस्तबद्धपणे फडकणारे भगवे ध्वज, झांज, ढोलताशा गजरात शिवप्रेमी तरुणाईचा सहभाग उत्साही होता. शिवजयंती चित्ररथ मिरवण्gकीची चित्रमय झलक....