महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाणी, आप, जल...

06:55 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उदकाचे देह केवळ,

Advertisement

उदकाचेच भूमंडळ,

Advertisement

चंद्र मंडळ, सूर्य मंडळ, उदकांकरिता,

क्षार सिंधू, क्षीरसिंधू सुरासिंधू, आज्यसिंधू,

दधी सिंधू, इक्षु सिंधू,

शुद्ध सिंधू उदकाचा...

समर्थांनी दासबोधामध्ये अनेक प्रकारच्या या सिंधुंचा उल्लेख केलेला दिसतो. यालाच आम्ही सप्तसागर असं म्हणतो. क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा सागर. असा सागर खरंतर कुठेही प्रत्यक्षात नाही परंतु माणसं आणि प्राणी यांच्यातलं मातृत्व दुधामुळे एकसमान ठरतं. प्राण्यांचं दूध माणसाला चालू शकतं म्हणून तो शिरसिंधू.

दधी सिंधू... याच दुधाचं दही माणसाच्या प्रेमाचे एकत्रीकरण आपल्याला जाणून देतात. घृत सिंधू.... दुधाचे दही आणि दह्याचं तूप म्हणजेच गुरुतसागर या सागराचा उपयोग आपल्यामध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी होतो. मद्य सिंधू......पृथ्वी निर्मितीच्या वेळेला मधु आणि कविता नावाचे दोन राक्षस होऊन गेले. त्यातला मधु म्हणजे मद्याचा सागर आजही आपल्याला जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतोय. त्याच्यात कोणतीही कमी आलेली दिसत नाही.

क्षार सिंधू.... मिठाचा सागर म्हणजेच मिठाचे उत्पादन म्हणून हा सागर. मात्र प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतो इक्षु सिंधू.... जीवनातलं माधुर्य हे उसाच्या रसाप्रमाणे असतं. खरं तर ऊस हा घटकच असा आहे की त्यातली कोणतीच वस्तू वाया जात नसते. अशी व्यक्ती आपल्याला भेटणं अशी घटना घडणार ही आपल्या दृष्टीने एक शूरसासारखेच आनंददायी असते.

शुद्ध सिंधू.... खरंतर आजकाल सर्वत्र प्रदूषण असल्याने कुठलंच पाणी शुद्ध रूपात शिल्लक राहिलेलं नाही पण पाणी हे आपण प्रतीक मानून शुद्ध स्वभावाचा माणूस असं जर शोधायचं ठरलं तर ते मिळणंसुद्धा खूप कठीण आहे. आपल्याकडे जे जे महापुरुष संत महंत होऊन गेले ते सगळे या शुद्ध जलाचेच स्त्राsत मानले जातात.

माऊली यासाठी फार सुंदर दृष्टांत देते

‘माळीया जेऊ ते नेले ...

तेऊ ते निवांतची गेले ..

तया पाणी ऐसे केले ...

व्हावे गा....... ’

माणसाने पाण्यासारखे असावे. ज्या स्थितीला जाऊ, त्याप्रमाणे आपला रंग भावना या सगळ्या बदलता आल्या पाहिजेत. पाण्याला त्याचं वेगळं अस्तित्व नसतंच. नदीच्या पाण्यातदेखील चांगलं आणि वाईट येऊन पडतंच, या सगळ्यांना घेऊन नदी पुढे निघालेली असते. ती कोणाला दोषही देत नाही आणि कोणी आल्याचा आनंदही मानत नाही. स्वत: बरोबर आणलेल्या गोष्टींचे उत्तम खत बनवून नदी किनारे समृद्ध करत निघते. हा तिचा आणि तिच्यातल्या पाण्याचा गुण माणसांमध्ये यायला हवा.

‘फेडीत जगाचे पाप,

पोषित तिरीचे पाप,

जैसे जाय आप संगे.’

आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याचे पूजन खूप महत्त्वाचं मानलं आहे. या पाण्यालाच वरूण ही देवता दिलेली आहे. वरूणाला वेदांनी ‘ऋतस्य गोप्ता’ म्हणजे विश्व धर्माचे रक्षण करणारा, उदकसमुहाचा शासक असे म्हटले आहे.

अशा या पाण्याची निर्मिती, लय आणि पुनर्निर्मिती या सर्व गोष्टी पृथ्वीवरच शक्य असतात. पाण्याला जशा वेगवेगळ्या चवी, जसे वेगवेगळे रंग तशाच वेगवेगळ्या स्थितीत देखील आरंभापासून शेवटपर्यंत पाणी हा शरीराचा अविभाज्य भाग आहेच. अशा या पाण्याला समर्थ म्हणतात

‘उदक तारक, उदक मारक उदक नाना, सौख्यदायक पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे’

कारण...‘पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरती प्रकटले उदंड पाणी’ अशा या पाण्याचा महिमा अनेक संतांनी गायला आहे आणि आपण सर्वजण तो रोज अनुभवत असतोच.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article