पाकिस्तानमध्ये पहिली हिंदू मुलगी बनली असिस्टंट कमिशनर
इस्लामाबाद
भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये एक विशेष घटना घडली आहे. यामध्ये प्रथमच एक हिंदू मुलगी असिस्टंट कमिशनर बनली आहे. या मुलीचे नाव सना रामचंद्र आहे. हे पद प्राप्त करण्यासाठी सना सेंट्रल सुपिरीयर सर्व्हिस (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. त्यानंतर ती पाकिस्तान प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाली आहे. सना पेशाने एबीबीएस डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. सीएसएसने घेतलेल्या परिक्षेमध्ये 18,553 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामध्ये 221 जण उर्त्तीण झाल्याची माहिती आहे. मी या यशामुळे खूप खूश असून लहानपणापासून घेतलेल्या कष्टाला अखेर फळ मिळाले असल्याचेही सना यांनी नमूद केले आहे. सना या शाळा, कॉलेजसह एफसीपीएस परीक्षांपर्यंत अक्वल स्थानी राहिल्या असल्याची नेंद केली आहे. सना या सिंध प्रांतामधील शिकारपूर जिल्हय़ातील राहणाऱया आहेत. त्यांनी चंदका मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.