पहिल्यांदाच गर्भाशयात पॉम्पे आजाराचा उपचार
आनुवांशिक रोगापासून आयला हिला वाचविले
याच रोगाने घेतला होता तिच्या बहिणींचा जीव
कॅनडाच्या ओंटारिया येथे राहणारी 17 महिन्यांची आयला बशीर हिच्या दोन बहिणींचा आनुवांशिक आजार पॉम्पेमुळे मृत्यू झाला होता. परंतु आयला या आजारापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. डॉक्टरांनी आयलाच्या जन्मापूर्वीच तिच्यावर उपचार केले होते.
जगात पहिल्यांदाच एखाद्या आजारावरील उपचार जन्मापूर्वीच गर्भाशयात वाढत असलेल्या गर्भावर केले आहेत. या उपचारांना डॉक्टरांनी आता यशस्वी ठरविले आहे. अमेरिका आणि कॅनडाच्या वैज्ञानिकांनी एका नव्या तंत्रज्ञानाद्वारे दुर्लभ आनुवांशिक आजारावरील उपचार केले होते.
पॉम्पे आजार
आयलाच्या कुटुंबात अशाप्रकारचा जेनेटिक म्हणजेच आनुवांशिक आजार आहे, ज्यात शरीराच्या पेशींमध्ये ग्लाइकोजन नावाचे कॉम्प्लेस शुगर जमा होऊ लागते. याच्यामुळे शरीरात काही किंवा सर्वप्रकारचे प्रोटीन्स तयार होत नाहीत आणि यातून रुग्णाचा मृत्यू ओढवत असतो. डॉक्टरांनी आयलावर ज्या पद्धतीने उपचार केले, त्याचा तपशील न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित केले आहे.
गर्भनाळेद्वारे भ्रूणात विशेष एंझाइम
ओटावा रुग्णालयातील भ्रूण औषध तज्ञ डॉक्टर कॅरेन फंग यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. गर्भनाळेद्वारेला भ्रूणाला महत्त्वपूर्ण एंझाइम देण्यात आले. संबंधित महिलेने गर्भ धारण केल्याच्या 24 आठवडय़ांनी हे उपचार करण्यात आल्याचे डॉक्टर कॅरेन यांनी सांगितले आहे.