महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडचा 18 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर कसोटी विजय

06:02 AM Feb 20, 2022 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

ख्राईस्टचर्च

Advertisement

यजमान न्यूझीलंडने शनिवारी येथे खेळाच्या तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 276 धावांनी दणदणीत पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये न्यूझीलंड संघाने तब्बल 18 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर हा पहिला विजय मिळविला आहे.

Advertisement

या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 482 धावांचा डोंगर उभा केला. निकोल्सने 105 तर ब्लंडेलने 96 धावा झळकविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 95 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलो ऑन स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेवर 387 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावातही न्यूझीलंडने भेदक गोलंदाजी केली.

3 बाद 34 या धावसंख्येवरून दक्षिण आफ्रिकेने शनिवारी तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 111 धावांत आटोपला. या सामन्यात  दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 23 धावांत 7 गडी बाद करणारा तसेच न्यूझीलंडच्या पहिल्या डावात शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 58 धावा जमविणाऱया न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. हेन्रीने दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावात 32 धावांत 2 गडी बाद केले. त्याने या सामन्यात 55 धावांत 9 बळी मिळविले आहेत.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 45 कसोटी सामने झाले असून न्यूझीलंडने 5 सामने जिंकले आहेत. या विजयामुळे न्यूझीलंड संघाचे विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेंतील स्थान वधारले आहे. न्यूझीलंडने आयसीसीच्या पहिल्या विश्वकसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. आता दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी पुढील शुक्रवारपासून हॅग्लें ओव्हल मैदानावर खेळविली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी आपल्या घरच्या मैदानावर भारताविरूद्धची कसोटी मालिका जिंकली होती.

पहिल्या कसोटीतील शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी केवळ अडीच तासात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव संपुष्टात आला. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज  साऊदीने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 14 व्या खेपेला पाच गडी बाद केले असून त्याने न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीचा कसोटीतील विक्रम मागे टाकला आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका बरोबरीत राहिली होती.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड प. डाव- सर्वबाद 482 (निकोल्स 105, ब्लंडेल 96, हेन्री 58), दक्षिण आफ्रिका प. डाव सर्वबाद 95 (हेन्री 7-23), दक्षिण आफ्रिका दु. डाव सर्वबाद 111 (साऊदी 5 बळी, हेन्री 2-32)

Advertisement
Tags :
#sports#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia