कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवृत्तीनंतरही थाट कायम

06:16 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिडनीच्या ग्राऊंडवर डेव्हिड वॉर्नरची हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने नुकतेच कसोटी आणि वनडे क्रिकेटला अलविदा केला. सिडनीच्या मैदानावर पाकिस्तानविरूद्ध त्याने  कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला. यावेळी अवघं स्टेडियम वॉर्नरच्या फेअरवेलसाठी मैदानावर अवतरलं होते. आता याच सिडनीच्या मैदानावर डेव्हिड वॉर्नरने ग्रँड एन्ट्री घेत सर्वांच लक्ष वेधले. शुक्रवारी आपल्या भावाच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर उतरला. विशेष म्हणजे, त्याची एंट्री हिरोपेक्षा कमी नव्हती. अशी एंट्री जी तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच पाहिली असेल. निवृत्ती झाला असला तरी आपला थाट काही कमी झाला नसल्याचे वॉर्नरने दाखवून दिले. मैदानावरील या ग्रँड एंट्रीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात शुक्रवारी बिग बॅश लीग सामना खेळवला गेला. गेल्या आठवड्यात वॉर्नरने याच मैदानावर शेवटची कसोटी खेळली होती. वनडे आणि कसोटीला अलविदा केल्यानंतर वॉर्नर प्रथमच या सामन्यात फलंदाजी करताना दिसणार आहे. हंटर व्हॅलीमधील भावाच्या लग्नातून तो थेट तिथे पोहोचला. त्याचे हेलिकॉप्टर थेट मैदानाच्या मधोमध उतरले. दरम्यान, वॉर्नरच्या या ग्रँड एंट्रीचा व्हिडिओ बीबीएलच्या अधिकृत पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. वॉर्नरची एंट्री खूपच भारी होती. मैदानावर उतरल्यानंतर वॉर्नर माध्यमांशी बोलताना म्हणाला, आकाशातून सिडनी शहराचे विहंगम दृश्य पाहणे हा एक वेगळाच आनंद आहे. वनडे व कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर आता बीबीएलमध्ये फोकस करणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

सिडनी थंडरसाठी तीन सामने खेळणार

वॉर्नरने गेल्या हंगामापूर्वी सिडनी थंडरसोबत 2 वर्षांचा करार केला होता. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे तो सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. आता सिडनीचे तीन सामने बाकी आहेत. या तीनही सामन्यात तो सहभागी होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने वॉर्नरच्या सिडनी थंडर संघाला 19 धावांनी पराभूत केले. सिक्सर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 151 धावा केल्या. यानंतर थंडर संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 19.5 षटकांत 132 धावांवर आटोपला. थंडर संघाकडून वॉर्नरने सर्वाधिक 37 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article