महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाणं लागलं पळायला...

06:08 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

(लहानपणी ‘पळपुटी पुरी’ नावाची कथा वाचली होती. तेव्हा पुरी म्हणजे सणावाराला होणारा पदार्थ. पण आता त्याचं महत्त्व एवढे राहिले नाही. आम्ही पैशाच्या मागे धावतांना, जेवणाचा अस्वाद घ्यायचा असतो हेच विसरून गेलोय. अशा लोकांना विचार करायला लावणारी गोष्ट.)

Advertisement

पूर्वी पाहुणे आले की मुलांच्या हातावर 1 पैसा, 5 पैसे खाऊला देत, त्या मुलाला आपण एकदम श्रीमंत झाल्यासारखे वाटायचे. एकदा एका रस्त्यात एका गरीब मुलाला कोणीतरी असाच 1 पैसा दिला. खरं तर त्याने लगेच खाऊ खायला हवा होता, पण तो एका बियाणं विक्रीच्या दुकानात गेला. एका पैशात नेमके किती बियाणं द्यायचं हे त्याला बाबड्याला कळेना. शेवटी तो मुलगा म्हणाला, माझा तळहात घामाने भिजलाय त्याला चिकटून येतील तेवढीच बियाणं द्या! दुकानदार तयार झाला. त्या मुलाने बियाणं घेतलं. त्याची रोपं तयार केली अन् मोठ्ठा शेतकरी झाला. यातून तो हळूहळू पैसा मिळवत गेला. पण ते नाणं काही दुकानात थांबलं नाही. ते गोल गोल असल्याने पळत निघालं. शहरात एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बसलं. तेवढ्यात समोरून मिनू आली. तीनही पटकन नाणं उचललं आणि खिशात टाकलं. अन् पळत पळत बाकावर जाऊन बसली. खिशात हात घालून नाणं बघू लागली. अरे बापरे, खिसा फाटलेला. तेवढ्यात चिंटूही आला हवेत हात फिरवत. मोठ्या हौसेने मला गंमत मिळाली म्हणून आनंदाने सांगू लागला. मिनूसमोर मूठ धरली...काय रे? दाखव ना! मुठ उघडली ...पण कसचं काय? नाणं पडून गेलं होतं......दोघंही घाबरले....भुताटकी झाली की काय? नाणं पळून जातं म्हणजे काय? आजोबा म्हणायचे लक्ष्मी चंचल असते. पण ती पळते असं नव्हते म्हणाले.

Advertisement

चला सगळ्यांना सांगायला हवं. सगळीकडे पळणाऱ्या नाण्याचीच चर्चा सुरू झाली. इकडे ते नाणं कचरेवाल्या सखुबाईला मिळालं. उपाशी पोरांना खायला काहीतरी घेऊन जावं म्हणून हॉटेलात गेली. मालकाला नाणं दिलं. आता नाणं शांत बसलं होतं. पैशामागे न धावणारी, कष्ट करून प्रामाणिकपणे जगणारी सखुबाईसारखी माणसं परत भेटतील म्हणून नाणं वाट बघत बसलं. त्यासाठी पळणाऱ्यांकडे पाठ फिरवली. आपल्यामागे अपेक्षेने पळणारे नको, आपल्याला मदत करता येईल अशा लोकांच्या मागे पळणारी नाणी भेटायलाच हवीत. जी निरागस मुलांना भेटतात.

When you stop to chess the money ,...money starts to run after you.....!

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article