कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नागालँडमध्ये अजित पवार गटाला मोठा दिलासा

06:15 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सभापतींनी फेटाळली 7 आमदारांच्या विरोधातील याचिका

Advertisement

वृत्तसंस्था/ कोहिमा

Advertisement

नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमेर यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदारांच्या विरोधात शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटाकडून दाखल अपात्रता याचिका फेटाळली आहे. अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. याचाच दाखला देत विधानसभा अध्यक्षांनी स्वत:चा निर्णय जाहीर केला आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय आता समोर आला आहे. संबंधित आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दर्शविले होते. आयोगाच्या निर्णयानुसार या आमदारांवर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. याचमुळे त्यांच्या विरोधातील तक्रार प्रलंबित ठेवण्याचे कुठलेच औचित्य नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्वत:च्या आदेशात नमूद केले आहे.

नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एर. पिक्टो शोहे, पी. लोंगोन, नाम्री नचांग, वाय. म्होनबेमो हम्त्सो, एस. तोइहो येप्थो, वाई मनखाओ कोन्याक आणि ए. पोंग्शी फोम यांच्या विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने तक्रार केली होती.

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटाचे नेते हेमंत टकले यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी या 7 आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने समर्थनपत्र दिले होते. यामुळे टकले यांनी हे 7 आमदार पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा केला होता. तर विधानसभा अध्यक्षांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून 7 आमदारांच्या विरोधातील याचिकेवर निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय दिला जात नाही तोवर कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. आयोगाने अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे स्वत:च्या निर्णयात नमूद पेल होते. यामुळे अजित पवार यांना समर्थन दर्शविण्याचे कृत्य पक्षविरोधी ठरत नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे.

 

Advertisement
Next Article