For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नड्डा,मालवीय यांच्या विरोधात तक्रार

06:22 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
नड्डा मालवीय यांच्या विरोधात तक्रार
Advertisement

भारतीय जनता पक्षाने आपल्या सोशल मिडिया वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या एका कथित व्हिडीओसंबंधी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार सादर केली आहे. एका विशिष्ट उमेदवाराला मत न देण्याविषयी या व्हिडीओच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या मतदारांना धमकाविण्यात येत आहे, असा दावा काँग्रेसने आपल्या रविवारच्या तक्रारीत केला आहे.

Advertisement

ही तक्रार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, या पक्षाच्या सोशल मिडिया कक्षाचे प्रभारी अमित मालवीय आणि भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र या नेत्यांच्या विरोधात करण्यात आली आहे. ही तक्रार काँग्रेसचे मिडिया प्रभारी रमेश बाबू यांनी सादर केली आहे.

या व्हिडीओत एका विशिष्ट धर्माशी संबंधित काही मजकूर असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाने अशा व्हिडीओसंबंधी वृत्त नाकारले आहे. तसेच काँग्रेसच दोन समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे नेते आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा आमच्या कुरापती काढण्यात धन्यता मानत आहेत. याचाच अर्थ, त्यांनी या निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही, याची कबुलीच दिली आहे. आतापर्यंतच्या मतदानातून मिळालेल्या कलानुसार विरोधकांचा पराभव निश्चित आहे, अशी टीका काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीसंबंधी पक्षाने केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.